टेस्ला गाडीची संपूर्ण जगभरात त्याच्या फिचरमुळे चर्चा आहे. ऑटो पायलट मोडबाबत कारप्रेमींमध्ये फारच उत्सुकता आहे. असं असताना सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल व्हिडीओत टेस्ला इव्ही कार रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या कारला धडकते. टेस्ला कंपनीची इलेक्ट्रिक कार पोलिसांच्या जवळून जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिस टाळाटाळ करताना दिसत आहेत. अपघाताच्या वेळी चालक इलेक्ट्रिक कार ऑटोपायलट मोडमध्ये ठेवून फोनमध्ये आनंदाने चित्रपट पाहत होता, असा आरोप आहे.
नॉर्थ कॅरोलिना अधिकार्यांनी अलीकडेच ऑटोपायलट मोडमध्ये चालणार्या टेस्ला ईव्हीचे डॅशकॅम रेकॉर्डिंग जारी केले. या व्हिडीओत गाडी चालताना दिसत आहे. थोड्याच वेळात, हायवेवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीला तिची धडक बसते. हा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यूजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
अपघातात सामील असलेले मॉडेल टेस्ला मॉडेल एस होते. देविंदर गोली नावाच्या डॉक्टरांच्या नावावर गाडी असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ऑगस्ट २०२० चा आहे आणि अपघाताच्या वेळी ड्रायव्हर फोनवर चित्रपट पाहत होता. या प्रकरणी अधिकारी तपास करत असून व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फ्लोरिडामध्ये असाच एक अपघात घडला होता, जिथे पोलिसांच्या वाहनाला टेस्ला मॉडेल ३ ईव्हीने मागून धडक दिली होती.