जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनीची असलेल्या Tesla चे सीईओ एलॉन मस्क हे या आठवड्याच्या अखेरीस चीनला भेट देणार आहेत. मागील तीन वर्षांमधील मस्क यांचा हा पहिला दौरा असणार आहे. एलॉन मस्क यांच्या दौऱ्यामागचा उद्देश हा टेस्लाच्या चीनमधील व्यवसायाशी संबंधित असू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चीनमधील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मस्क हे त्यांच्या आगामी दौऱ्यामध्ये चीनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. या भेटीमध्ये शांघायमध्ये उभारण्यात आलेल्या ईव्ही कंपनीवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त hindustantimes ने दिले आहे.
काही दिवसांपूर्वी टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी भारतात काही फॅसिलिटी सुरू करण्याच्या शक्यतांवर चर्चा केली आहे. टेस्लासाठी चीन महत्वाचा देश आहे. कारण बहुतेक ऑटोमोटिव्ह उत्पादक चीनमध्येच त्यांचा व्यवसाय करतात. शांघायमध्ये उभारण्यात आलेला प्लांट टेस्लासाठी पहिली फॅसिलिटी होती आणि ती २०१९ मध्ये सुरू करण्यात आला होता. एलॉन मस्क हे शांघायमधील प्लांटला भेट देण्याची शक्यता आहे. तसेच चीनमध्ये जागतिक आणि स्थानिक व्यवसायांमधील वाढती स्पर्धा पाहता, येणारी आव्हाने कशी कमी करता येतील याच्यावरही चर्चा करू शकतात.
अलीकडच्या काळामध्ये चीनमध्ये EV मागणी थोडी मंदावली आहे. तथापि चीन सरकार स्विच करण्यासाठी ग्रामीण खरेदीदारांना प्रोत्साहित करण्याचा विचार करत आहे. स्थानिक सरकारला आग्रह केला जात आहे की, केवळ खरेदीदारांनाच नव्हे तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचे आवाहन करावे. अशा परिस्थितीत, टेस्लासारखे जागतिक ब्रँड या क्षेत्रांमध्ये चांगली विक्री करू शकतात.
एलाॅन मस्कची Tesla भारतात एन्ट्री घेण्याच्या तयारीत
जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाने भारत सरकारशी संपर्क साधला आहे. कंपनीने भारत सरकारला बैठक घेण्याची विनंती केल्याची माहिती भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्यालय आणि भारत सरकारमधील प्रमुख प्रतिनिधींच्या भेटी घेत आहेत. भारत देशामध्ये आपल्या कंपनीचा विस्तार करण्याच्या हेतूने ही भेट असल्याची शक्यता मानली जात आहे. आता टेस्ला देशात दाखल होणार आहे का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
गेल्या वर्षी, टेस्लाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एलाॅन मस्क यांनी सांगितले होते की, कंपनी, जी आधी भारतात आपली वाहने विकण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याची मागणी करत होती, ती प्रथम स्वतःची सुविधा मिळाल्याशिवाय आपली उत्पादने तयार करणार नाही. कारला परवानगी नाही. विक्री आणि सेवा केली जाईल. टेस्लाने भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्याविषयी विचारलेल्या एका ट्विटला उत्तर देताना, मस्क म्हणाले, “टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारणार नाही जिथे आम्हाला आधी कार विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी नाही”.