टेस्लाच्या गाड्यांबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्याचबरोबर टेस्लाचे सीईओ एलोन मस्कही सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यामुळे त्यांचा चाहत्यांशी या माध्यमातून संवाद होत असतो. त्याचं प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट भविष्यातील वेध सांगणारे असतात. त्यामुळे एलोन मस्क कधीच चूक करू शकत नाही अशी अनेकांची धारणा आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलोन मस्क यांचा प्रत्येक निर्णय योग्य असेल असं नाही. त्यांचे काही निर्णय चुकू शकतात. याबाबतची जाहीर कबुली एलोन मस्क यांनी स्वत: दिली आहे. २०२० या वर्षी टेस्ला मॉडेल एक्सचे उत्पादन थांबण्याचा निर्णय मूर्खपणाचा होता, असं त्यांनी सांगितलं आहे.

टेस्लाच्या मॉडेल एक्सला सर्वाधिक पसंती आहे. या गाडीला फाल्कन विंगसारखा दरवाजा आहे. टेस्लाने मॉडेल एक्ची पहिली डिलिव्हरी २०१५ या वर्षी सप्टेंबर महिन्यात केली होती. मात्र कंपनीने अद्ययावत मॉडेल सादर करण्यासाठी याचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला. “नविन मॉडेल एक्स उत्पादनाबाबतचा निर्णय चुकला. त्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही. मागणी असताना आम्ही डिसेंबर २०२० मध्ये जुन्या एक्स मॉडेलचे उत्पादन थांबवण्याचा घेतलेला निर्णय मूर्खपणाचा होता.”, असं टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी सांगितलं आहे.

“भारतात गाड्या विकायच्या आणि नोकऱ्या चीनमध्ये, असं चालणार नाही”; केंद्रीय मंत्री क्रिष्ण पाल गुर्जर यांनी टेस्ला कंपनीला खडसावलं

उत्पादनात घट झाल्यामुळे मॉडेल एक्स आणि मॉडेल एसचे उत्पादन २०२० या वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये ५५ टक्क्यांनी घसरलं. विक्रीत देखील घट झाली. अद्ययावत मॉडेल एक्स गेल्या वर्षीच्या अखेरीस लाँच केलं गेलं आहे. यामुळे २०२० ते २०२१ या कालावधीत कंपनीला मोठा फटका बसला. तसेच ग्राहकांचा कंपनीकडचा ओढा कमी झाला.