टेस्लाकडे भविष्यातील कार उत्पादन करणारी कंपनी म्हणून पाहिलं जातं. टेस्लाच्या गाड्यांबाबत कायमच उत्सुकता असते. ऑटो मोड फिचर्सची कायम चर्चा होते. मात्र काही अतिरंजित दाव्यांमुळे अमेरिकन कार उत्पादक टेस्लाला तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. दक्षिण कोरियामधील मॉडेल ३ इव्हीची जाहिरात बदलण्यास भाग पाडलं आहे. कोरियन फेअर ट्रेड कमिशनने टेस्लाच्या वाहनांमधील इलेक्ट्रिक बॅटरीच्या कामगिरीला अतिशयोक्तीपूर्ण ठरवले आणि कारवाईसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली. त्यानंतर टेस्लाचे धाबे दणाणले आणि आपल्या जाहिरातीत बदल केले आहेत.

टेस्लाच्या कोरियन वेबसाइटवर मॉडेल ३ सेडानच्या जाहिरातीत दावा केला जात आहे की, ‘एका चार्जवर ५२८ किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते’. दुसरीकडे अमेरिकन वेबसाइटवर, टेस्ला मॉडेल ३ च्या कार्यक्षमतेचे वर्णन करते की, ‘एका चार्जवर अंदाजे ३५८ मैलांपर्यंत कोठेही जा.’ ३५८ मैल हे सुमारे ५७६ किमी इतके आहे. या दोन्ही दाव्यांमध्ये तफावत दिसत आहे. स्थानिक माध्यमांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दक्षिण कोरिया फेअर ट्रेड कमिशनने पावलं उचलण्यास सुरुवात केली. यानंतर टेस्लाने जाहिरातील ‘अधिक’ वरून ‘जास्तीत जास्त’ ५२८ किलोमीटरचा मायलेज असा बदल केला आहे.

indian railway viral video
ट्रेनमधून प्रवास करताना ‘ही’ एक चुक पडू शकते महागात, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान; पाहा धक्कादायक घटनेचा VIDEO 
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Metro fight between two women abuses each other in delhi metro viral video on social media
आधी मेट्रोतून बाहेर ढकललं मग केली शिवीगाळ, महिलांमधलं भांडण इतकं टोकाला गेलं की…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
child fell down from the scooter while his mother was driving it viral video on social media
आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप
lucknow passenger and conductor fight in roadways bus video viral
बसमध्ये तिकिटावरून राडा! कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral

इलेक्ट्रिक कार विकत घ्यायची आहे? महाराष्ट्रात किती अनुदान आहे जाणून घ्या

कोरिया फेअर ट्रेड कमिशनने टेस्लाला एक अहवाल पाठवला आहे., “जाहिरातीतून ग्राहक कायद्याचं उल्लंघन होत आहे. अहवालात कंपनीला आपली बाजू मांडण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्यांच्या उत्तरानंतर बैठक घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल.”, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. कोरियन नियामकाद्वारे टेस्लाची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे, एखादा ग्राहक टेस्लाच्या कोरियन वेबसाइटद्वारे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यूएस-आधारित इव्ही कंपनीला १ लाख वॉन (अंदाजे ६३ लाख रुपये) ऑर्डर फी मिळते. मात्र ग्राहकाने ऑर्डर रद्द केली तरी पैसे परत मिळत नाहीत. वाहन पाठवले आहे की नाही याची पर्वा न करता ऑर्डर फी परत करत नाही. कोरियन फेअर ट्रेड कमिशनने म्हटले आहे की, हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे कृत्य आहे.