टेस्लाच्या गाड्यांबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. कंपनी कोणतं मॉडेल बाजारात आणणार आहे? याबाबत विचारणा होत असते. तसेच टेस्ला वेबसाइट आणि सर्चिंग साईटवरून माहिती मिळवण्यासाठी धडपड सुरु असते. टेस्लाच्या गाड्यांबद्दल ग्राहकांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. टेस्लाचा सायबरट्रक लवकरच बाजारात येणार आहे. मात्र लॉन्चिंगपूर्वीच गाडीचे १३ लाख युनिट्स बुक झाले आहे. बुकिंगमधून जवळपास ८० बिलियन डॉलर (जवळपास ५९,५५४ कोटी रुपये) जमा झाले आहेत. कंपनीने तिची बुकिंग रक्कम १००० डॉलर निश्चित केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्याच आठवड्यात अडीच लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग झाले असून हा आकडा सातत्याने वाढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेस्ला सायबर ट्रक पहिल्यांदा नोव्हेंबर २०१९ मध्ये सादर करण्यात आला होता. टेस्ला सायबर ट्रकमध्ये जाड स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे. सायबर ट्रकची लांबी २३१.७ इंच, रुंदी ७९.८ इंच आणि उंची ७५ इंच आहे, यामध्ये सहा लोक बसू शकतात. बॅटरीवर चालणारे वाहन असून पिकअप दिसते आणि स्पोर्ट्स कारसारखी कार्यक्षमता आहे. “सायबरट्रकची बॉडी हतोडी किंवा छोट्या हत्यारांचा डॅमेज होणार नाही”, असा दावा टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी केला आहे.

सायबर ट्रकचे उत्पादन २०२२ च्या अखेरीस सुरु होण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक सायबरट्रक ६३०० किलो वजन खेचू शकतो. तसेच ३ सेकंदात १०० किलोमीटर वेग वाढवू शकतो. सायबरट्रकच्या टॉप मॉडेलची किंमत जवळपास ५२ लाख रुपये इतकी असेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tesla cybertruck booking 13 lakhs units before launching rmt