टेस्लाच्या गाड्यांबाबत जगभरातील ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टेस्लाच्या गाड्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढवण्यावर कंपनी भर दिला आहे. तसेच नवं मॉडेल लाँच न करण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या तिमाहीत गाड्यांची विक्रमी विक्री केल्यानंतरही कंपनीने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे कंपनीकडे गाडी खरेदीसाठी ग्राहकांची रिघ लागली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के अधिक वाहनं तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. जगभरात आणखी कारखाने उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सांगितले की, ‘जगातील सेमीकंडक्टर चिप संकटामुळे हा निर्णय घेतला आहे. सध्या आमच्याकडे पर्याप्त चिप आहेत.’
टेस्ला यंदा गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला सायबरट्रक लॉन्च करेल अशी अपेक्षा होती. मात्र कंपनीच्या निर्णयामुळे सायबरट्रकसाठी ग्राहकांना आणखी प्रतीक्षा करावी लागेल. याचा अर्थ टेस्लाच्या २५ हजार डॉलर्स किमतीच्या छोट्या, अधिक परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारवर काम करण्याच्या योजनेसाठी देखील प्रतीक्षा करावी लागेल. टेस्लाच्या सेमी आणि नवीन रोडस्टरचे उत्पादन देखील लांबणीवर गेले आहे.
टोर्क क्राटोसची इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच; ९९९ रुपयात करु शकता बुकिंग
टेस्लाने २०२१ या वर्षात ५ अब्ज डॉलर्स कमावले. तर २०२० या वर्षाती ही कमाई ३.४७ अब्ज डॉलर्स होती. टेस्ल्याने गेल्या वर्षी ९,३६,००० वाहनं वितरीत केली असून २०२० च्या तुलनेत दुप्पट आहे. दुसरीकडे, “इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवहार्यता आणि नफ्याबद्दल यापुढे शंका असू नये”, टेस्लाने भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने अधिक प्रगत बॅटरी सेलसह Y एसयूव्ही मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली आहे.