Cheapest Tesla Electric Car: इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. एलॉन मस्कची कंपनी टेस्ला इलेक्ट्रिक कारमध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर आहे, ज्याने अमेरिका आणि चीनसारख्या देशांमध्ये आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. जरी टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार अधिक महाग आहेत. अशा परिस्थितीत आता टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी घोषणा केली आहे की, टेस्ला एका स्वस्त कार प्रकल्पावर काम करत आहे ज्याचा फोकस मोठी बाजारपेठ काबीज करण्यावर आहे.
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला नवीन इलेक्ट्रिक कार विकसित करण्यावर काम करत आहे. कंपनीच्या इतर कारच्या तुलनेत ही नवीन इलेक्ट्रिक कार स्वस्त असेल असे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात, कंपनीचे सीईओ एलॉन मस्क म्हणतात की, नवीन इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी मॉडेल 3 च्या तुलनेत सुमारे अर्धा खर्च येईल, ज्यामुळे ती ग्राहकांना अधिक परवडणारी असेल.
(हे ही वाचा : कारप्रेमींसाठी आनंदवार्ता! मारुती, टाटासहीत ‘या’ दिग्गज कार कंपन्या चार CNG SUV आणणार, मायलेजमध्ये आहेत ‘बाप’ )
एलॉन मस्क यांनी सांगितले की, जे काही स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवल्या जातील. त्यापैकी निम्म्याहून अधिक गाड्या ऑटोनॉमस मोडच्या असतील. मात्र, या सर्व गाड्या कधी लॉन्च होतील हे त्यांनी सांगितलेले नाही. मस्क यांनी देखील मान्य केले आहे की त्यांच्या कंपनीच्या कार सध्या खूप महाग आहेत, ज्यामुळे कंपनी स्वस्त कार बनविण्यावर वेगाने काम करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत २० दशलक्ष इलेक्ट्रिक कार बनवण्याचे टेस्लाचे लक्ष्य आहे. त्यामुळेच कंपनी आपल्या नवीन उत्पादन प्रकल्पासाठी जमीन शोधत आहे.