Kia Carens New Variant: किआ इंडिया ने नवीन लक्झरी (O) प्रकार लाँच करून Carens MPV मॉडेल लाइनअपचा विस्तार केला आहे. नवीन प्रकार ७-सीट कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे. हे मॉडेल लाइन-अपमध्ये लक्झरी ट्रिमच्या वर आणि लक्झरी+ ट्रिम्सच्या खाली, म्हणजे दोन दरम्यान बसते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Kia Carens Luxury (O) व्हेरियंटमध्ये मल्टी ड्राईव्ह मोड, इलेक्ट्रिक सनरूफ आणि अॅम्बियंट लाइटिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. याशिवाय, लक्झरी ट्रिममध्ये आढळणारे सर्व फिचर्स यात येतात.
Kia Carens New Variant मध्ये काय आहे खास?
Kia Carens Luxury (O) प्रकारात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ४.२-इंच कलर MID, OTA अपडेटसह Kia Connect UI, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, एअर प्युरिफायर, दुसऱ्या रांगेतील सीटबॅकसाठी मिळते. टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील, सीट ट्रे अंतर्गत, फुल लेदरेट सीट्स, क्रूझ कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा, ६-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि गो, एलईडी हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल आणि एलईडी टेललॅम्पचा समावेश आहे.
(हे ही वाचा : मारुतीच्या ‘या’ ७ सीटर CNG कारचा नाद करायचा नाय, 26kmpl पर्यंतचं मायलेज, किंमत… )
यामध्ये ६ एअरबॅग्ज, हिल स्टार्ट आणि डिसेंट कंट्रोल, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर्स, ब्रेक असिस्ट सिस्टम, ऑल व्हील डिस्क ब्रेक्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांचा समावेश आहे. नवीन Kia Carens Luxury (O) प्रकारात १.५L टर्बो पेट्रोल इंजिन आणि १.५L डिझेल इंजिन पर्यायासह आणण्यात आले आहे.
पेट्रोल इंजिन युनिट २५३Nm सोबत १६०bhp तर डिझेल इंजिन युनिट ११५bhp आणि २५०Nm टॉर्क निर्माण करते. यात ६-स्पीड iMT, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक (केवळ डिझेल) आणि ७-स्पीड DCT ऑटोमॅटिकचा पर्याय आहे.
Kia Carens New Variant किंमत
Kia India ने १६.९९ लाख (एक्स-शोरूम) किंमतीत नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे.