The best way to use the clutch, gear and brakes: जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्यक्ती कार किंवा बाईक चालवायला शिकते तेव्हा तो अनेकदा ब्रेक दाबायला विसरतो. क्लच आणि ब्रेक एकाच वेळी दाबायचे की नाही, हेही अनेकांना माहीत नसते. कार किंवा बाईक चालवताना ब्रेक आणि क्लचचा वापर कसा करायचा याबद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळ्या टिप्स देतात. पण कोणती सूचना योग्य आहे हे तुम्हाला माहितेय का? चला तुमचा गोंधळ दूर करू आणि ब्रेक लावताना क्लच दाबावे की नाही, हे जाणून घेऊया. यासोबतच ब्रेकसोबत क्लचचा वापर केला जात असेल तर तो कोणत्या परिस्थितीत करावा, हेही माहित करुन घेऊया…

बाईक आणि कारमधील ब्रेकिंगशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

अचानक ब्रेक लागल्यास, तुम्ही क्लच आणि ब्रेक एकाच वेळी दाबू शकता. क्लच आणि ब्रेक्स सहसा आपत्कालीन परिस्थितीत एकत्र वापरले जातात कारण कारच्या अंतर्गत भागांना इजा न करता ब्रेक लावण्याचा हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. तथापि, लक्षात ठेवा की ब्रेक काळजीपूर्वक दाबावे.

(हे ही वाचा : Hero, Bajaj चा खेळ खल्लास? Honda ची नवी बाईक बाजारात दाखल; मिळेल १० वर्षाची वाॅरंटी, किंमत फक्त… )

जास्त वेगात आधी ब्रेक दाबणे अधिक योग्य आहे आणि नंतर जर तुम्हाला कार थांबवायची असेल किंवा कारचा वेग सध्याच्या गिअरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचला असेल तर तुम्ही क्लच दाबा. तुम्ही असे न केल्यास, तुमची कार किंवा बाईक, तुम्ही वापरत असलेले कोणतेही वाहन खराब होऊ शकते.

जर तुम्हाला वाटत असेल की, कार किंवा बाईकला थोडा ब्रेक लावावा लागेल, तर फक्त ब्रेक दाबा, त्यासाठी क्लच वापरण्याची गरज नाही. जर तुम्हाला कार-बाईकचा वेग कमी करायचा असेल किंवा मार्गात एखादा छोटासा अडथळा असेल, तो टाळण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावे लागेल, तरच तुम्ही ब्रेकचा वापर करू शकता.

जर तुम्ही सध्याच्या गीअरमध्ये सर्वात कमी गिअरमध्ये असाल, तर प्रथम क्लच दाबा आणि नंतर ब्रेक दाबा. आधी ब्रेक दाबल्यास गाडी थांबू शकते. हे पहिल्या किंवा दुसऱ्या गीअरमध्ये केले जाऊ शकते, परंतु ते वेगाने होणार नाही याची काळजी घ्या.

Story img Loader