Citroen eC3 EV Bookings Open: फ्रेंच ऑटो कंपनी Citroen आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात आता लवकरच लाँच करणार आहे. ही कार कंपनीच्या सध्याच्या मॉडेल Citroen C3 वर आधारित असणार असून कंपनीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे नाव ‘Citroen eC3’ आहे. ही कार इतर कंपन्यांना मोठी टक्कर देणार आहे. कमी किमतीत कंपनी कार उपलब्ध करून देणार असून कंपनीने लॉन्च होण्यापूर्वी अधिकृतपणे कारची बुकिंग विंडो उघडली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Citroen eC3 कारची ‘अशी’ करा बुकिंग
Citroen e C3 बुक करण्यासाठी, ग्राहक Citroen India च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात, याशिवाय जवळच्या Citroen डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात. या इलेक्ट्रिक कारच्या बुकिंगसाठी कंपनीने २५,००० रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.
Citroen eC3 कार डिझाईन
नवीन इलेक्ट्रिक कार eC3 चे डिझाईन Citroen च्या C3 मॉडेल सारखे आहे. Citroen eC3 ची रचना अंतर्गत ज्वलन इंजिनसह C3 मॉडेलप्रमाणेच केली गेली आहे. या eC3 कारमध्ये Citroen लोगो असलेली स्लीक ग्रिल दिसेल. नवीन इलेक्ट्रिक कारला सेमी-क्रॉसओव्हर डिझाइन देण्यात आले आहे.
(हे ही वाचा: जबरदस्त फीचर्स असणारी Luxury SUV भारतात लाँच; एका बटणाने होणार दरवाजा बंद, किंमत…)
Citroen eC3 कार सिंगल चार्जवर ३०० किमी पेक्षा जास्त रेंज देणार
आगामी Citroën eC3 २९.२kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जवर ३२० किलोमीटर (ARAI) ची रेंज देईल. बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे ५६ bhp पॉवर आणि १४३ Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या या इलेक्ट्रिक कारचा कमाल वेग ताशी १०७ किलोमीटर आहे. बॅटरी चार्ज करण्यासाठी DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने ५७ मिनिटांत बॅटरी १० टक्के ते ८० टक्के चार्ज करता येते, तर १५ अँप सॉकेटच्या मदतीने बॅटरी १० टक्के ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी १० तास ३० मिनिटे लागतात.
Citroen eC3 कारमधील वैशिष्ट्ये
इंजिनने सुसज्ज असलेल्या Citroën C3 मॉडेलच्या मॅन्युअल एसी प्रकारात जी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, तीच वैशिष्ट्ये नवीन इलेक्ट्रिक कारमध्येही पाहायला मिळतील. Citroen eC3 कारमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि अनेक डिजिटल उपकरणांसह १०-इंचाची इन्फोटेनमेंट प्रणाली आहे. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार दोन ट्रिममध्ये उपलब्ध केली जाईल.
(हे ही वाचा: १०० किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर FREE मध्ये बुक करा, टॉप स्पीडही आहे जबरदस्त )
Citroen eC3 कधी होणार लाँच आणि किंमत किती?
Citroen eC3 ही नवीन कार फेब्रुवारी २०२३ मध्ये देशात लाँच होणार आहे. कंपनीकडून अद्याप किंमतीची माहिती मिळालेली नाही. पुढील महिन्यात लॉन्च होणार्या Citroen eC3 कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ९ लाख रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.