रॉयल एनफिल्ड कंपनीनं क्लासिक ३५० या मॉडेलच्या २६,३०० गाड्या पुन्हा मागवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाइक चाहत्यांमध्ये याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात ब्रेकमध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. १ सप्टेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत उत्पादित केलेल्या गाड्यांमध्ये ही समस्या प्रामुख्याने समोर आली होती. त्यानंतर कंपनीने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. मोटरसायकलच्या स्विंग आर्मशी निगडित ब्रेक रिअ‍ॅक्शन एका स्पेसिफिक रायडिंग कंडिशनमध्ये खराब होऊ शकते, असं रॉयल एनफिल्डच्या टेक्निकल टीमला दिसून आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“विशिष्ट राइडिंग परिस्थितीत असे आढळून आले की, मागील ब्रेक पेडलवर ब्रेकिंग लोडमुळे रिअ‍ॅक्शन ब्रॅकेटचे संभाव्य नुकसान होऊ शकते. ज्यामुळे ब्रेकिंगचा असामान्य आवाज येऊ शकतो आणि ब्रेकिंग कार्यक्षमतेत संभाव्य बिघाड होऊ शकतो. १ सप्टेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत उत्पादित सिंगल-चॅनल ABS रियर ड्रम ब्रेक क्लासिक ३५० मॉडेल्समध्ये ही समस्या आहे,” असं कंपनीने सांगितले आहे.

Hero HF Deluxe vs TVS Sport: कमी बजेट आणि मायलेजसाठी बाइकचा कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या

कंपनी याबाबत सर्व्हिस टीम आणि डिलरशीपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधणार आहे. त्याचबरोबर माहिती मिळवण्यासाठी रॉयल एनफिल्डच्या वेबसाइट किंवा स्थानिक वर्कशॉपला भेट देऊन याची माहिती घेता येईल.. याशिवाय माहितीसाठी कंपनीच्या हेल्पलाइन नंबर – १८०० २१०००७ वर कॉल देखील करू शकता.