रॉयल एन्फिल्ड ही दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांतील अग्रगण्य आणि प्रसिद्ध कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येकवेळी काही ना काही नवी घेऊन येत असते. आताही या कंपनीने ‘Scram 411’ ही बाईक नव्या अवतारात म्हणजेच काही नवीन वैशिष्ट्यांमध्ये बाजारात लाँच केली आहे. रॉयल एन्फिल्ड Scram 411 यामध्ये सुपर एडिशन मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आल्यामुळे ही गाडी अधिक मजबूत आणि स्पोर्टी दिसत आहे. रॉयल एन्फिल्ड ही कंपनी गाड्यांचे मजबूतपणा तसेच शक्तिशाली इंजिन यासाठी प्रसिद्ध आहे. RE हिमालयन स्क्रॅम 411या बाईकमध्ये बदल करून Scram 411 हे मॉडेल लाँच केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉयल एनफील्ड Scram 411 ची वैशिष्ट्ये

या नवीन मॉडेलवर जर्मनीमधील Crooked Motorcycles या कंपनीने काम केले आहे. तसेच हे मॉडेल आकर्षक रंगामध्ये उपलब्ध असून याची बॉडी ही ऍल्युमिनिअम आणि फायबर पासून तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये याची पेट्रोलची टाकी सुद्धा बदलण्यात आली आहे. या बाईकमध्ये अनेक टेक्निकल बदल करण्यात आलेले असून आधी सांगितल्याप्रमाणे नवीन इंधन टाकी हि सीट च्या खाली बसवण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Mahindra Scorpio N : ‘या’ ५ वैशिष्ट्यांसह येणार ‘महिंद्रा स्कॉर्पिओ एन’

हे मॉडेल केवळ आकर्षक दिसत नाही तर , वेगाने सुद्धा पळते. यामध्ये नवीन सीट आणि पेट्रोल टाकीसोबतच सुपरनोव्हा एलईडी हेडलाईट्स , कस्टम टेल लाईट्स आणि इतर अनेक बदल यामध्ये बघायला मिळतात. या मॉडेलमध्ये नंबर प्लेट , स्पीडोमीटर किंवा इंडिकेटर सारखे भाग दिसण्यात येत नाहीत.

या बाईकला १९ इंचाचे फ्रंट आणि १७ इंचाचे बॅक व्हील आहेत. या बाईकचे तयार हे Metzeler Sportec M9 असणार आहेत. या बाईकच्या ब्रेकिंग सेटअप मध्ये बदल करण्यात आलेले नाहीत तर, Probrake levers and LSL handlebars असे नवीन फिचर बघायला मिळतात. या बाईकला hort-stroke throttle, Biltwell Inc. grips and a CNC-machined start button हे असणार आहे. या बाईकला फिनिशिंग टच हा काळ्या आणि पिवळ्या रंगांमध्ये दिसून येते.

हेही वाचा: फक्त ७० हजाराचा डाउनपेमेंट करून घरी न्या मारुतीची ‘ही’ जबरदस्त मायलेजवाली कार

आता जाणून घेऊयात बाईकची किमंत

रॉयल एनफील्ड Scram 411 या बाईकची एक्स शोरूम प्राईस २ लाख ते रुपयांपासून सुरू होते ते २.०८ लाखांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The company royal enfield launched the scram 411 bike in a new version with some changes auto news tmb 01