Best Electric Scooter: मागच्या काही दिवसांपासून आपल्या देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे. सध्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वाधिक खरेदी केली जात आहे. TVS iQube ही Ola नंतर देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. गेल्या महिन्यात TVS ने ७,७९१ इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या. आज आम्ही तुम्हाला TVS iQube च्या किमती आणि फीचर्सबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही TVS इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube, TVS iQube S, TVS iQube ST या तीन आवृत्त्यांमध्ये येते. पहिल्या दोन प्रकारांची किंमत १.३१ लाख ते १.४६ लाख रुपये आहे. तिसरा व्हेरियंट अजून सादर व्हायचा आहे. यातील सर्वात शक्तिशाली TVS iQube ST आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज झाल्यावर १४५ किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

(हे ही वाचा : Ertiga ची ‘ही’ ७ सीटर कार उडवतीये झोप, धडाधड विकली जातेय MPV, शोरुम्ससमोर लागल्या ग्राहकांच्या रांगा )

त्याचा टॉप स्पीड ८२ किलोमीटर प्रति तास आहे आणि स्कूटरची बॅटरी ० ते ८० टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे ४ तास लागतात. स्कूटरचे वजन १२८ किलोग्रॅम आहे आणि शून्य ते ४० किमी प्रतितास वेग घेण्यासाठी ४.२ सेकंद लागतात. iQube ची एकूण रचना पारंपारिक स्कूटर सारखीच आहे, परंतु याला काही भविष्यवादी आकर्षण देखील मिळते. याला हँडलबार काऊलवर U-shaped LED DRLs सह स्लीक हेडलॅम्प आणि टेललॅम्प मिळतात. यात मोठी सीट, मोठा फूटबोर्ड आणि लगेज हुक मिळतो.

स्कूटरमध्ये वैशिष्ट्यांची मोठी यादी आहे. स्कूटरमध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्याद्वारे तुम्ही संगीत चालू किंवा बंद करू शकता, तसेच सोशल मीडिया नोटिफिकेशन्स त्यावर उपलब्ध असतील. यात ४५ कनेक्टेड वैशिष्ट्ये आहेत, ज्यात अलेक्सा इंटिग्रेशन, रिमोट व्हेइकल इमोबिलायझेशन आणि रिमोट अनलॉकिंग यांचा समावेश आहे. स्कूटरमध्ये ३२ लीटर अंडर सीट स्टोरेज देण्यात आले आहे, ज्यामध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील उपलब्ध आहे. आपण त्याच्या स्टोरेजमध्ये दोन हेल्मेट सहजपणे ठेवू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The company said its electric scooter tvs iqube electric recorded sales of 14462 units in june 2023 pdb
Show comments