Upcoming Harley Bike in India:  Harley Davidson रॉयल एनफिल्डला आपल्या परवडणाऱ्या स्पोर्टी क्रूझर बाईकसह भारतात टक्कर देण्यासाठी जवळजवळ तयार आहे. आता या बाईकचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. फोटोनुसार, बाईक उत्पादनासाठी जवळजवळ तयार असून लवकरच लाँच केली जाईल असे दिसते. हार्ले डेविडसनची ही आजवरची सर्वात स्वस्त बाईक असणार असल्याचा दावा केला जात आहे. जी भारतीय बाजारपेठेसाठी तयार केली जात आहे. Hero MotoCorp सोबत तयार होत असलेल्या नवीन Harley Davidson बाईकचे हे मॉडेल पॉवरफुल असेल आणि क्रूझर सेगमेंटमध्ये प्रवेश करेल.

डिझाईन

डिझाईनबद्दल बोलताना, फोटोनुसार, ही बाईक स्पोर्टी क्रूझर किंवा रोडस्टर असेल, तर मस्कुलर टँक त्याच्या हार्ले डिझाइनकडे इशारा करते. त्याचवेळी, विशिष्ट डिझाइनसह डीआरएल एलईडी लाइट हा बाकीच्या हार्लेपेक्षा वेगळे बनवते. तथापि, या बाईकसाठी TFT सारख्या वैशिष्ट्यांसह प्रीमियम दर्जाची अपेक्षा केली जाऊ शकते.

Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
nagpur sub capital citizens are increasingly preferring electric vehicles
नागपुरकरांची इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती… तीन वर्षांत दुचाकी, चारचाकी…
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

त्याची रचना क्रूझरपेक्षा थोडी चांगली देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तो पूर्णपणे हार्ले डेव्हिडसन सारखा नसताना थोडा स्पोर्टी दिसतो. वास्तविक, स्पेसिफिकेशन्स लवकरच उघड होऊ शकतात, परंतु त्याच्या दिसण्यावरून असे दिसते की, बाईक चांगल्या ग्राउंड क्लिअरन्ससह भारतीय रस्त्यांना चांगला प्रतिसाद देण्यास सक्षम असेल.

(हे ही वाचा : मोठी बातमी! ओलाने सर्वात जास्त विकणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत केली ५ हजारांची कपात )

इंजिन

या बाईकमध्ये मिळालेल्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते सिंगल सिलेंडरसह ४००cc च्या वर दिसू शकते. ज्याला ६-स्पीड गिअरबॉक्ससह पेअर केले जाऊ शकते. ज्यावरून हे स्पष्ट होते की, ते Royal Enfield Hunter 350 आणि Jawa 42 शी स्पर्धा करणार आहे. Hero MotorCorp द्वारे निर्मित Harley Davidson बाईकची किंमत सर्वांनाच धक्का देणारी ठरू शकते. जेणेकरून अधिकाधिक नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यात ते यशस्वी होऊ शकेल.

किंमत

या बाईकची चाचणी जयपूर स्थित हिरो मोटोकॉर्पच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये केली जात आहे. लवकरच ही बाईक भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. कंपनी ही बाईक २.५ ते ३ लाख रुपयांच्या किमतीत सादर करु शकते. बाजारात दाखल झाल्यानंतर ही बाईक रॉयल एनफील्डच्या क्लासिक ३५० ला टक्कर देईल. 

Story img Loader