Cheap and Best Electric Scooter in India: सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या दरांमुळे (Petrol Price Hike) तुम्हीही हैराण झाला असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बाजारपेठेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाल्यात. त्यात अनेक स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटर (Cheapest Electric Scooter) देखील आल्या आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही पाच स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी घेऊन आले आहोत. चला बघूया कोणत्या आहेत या इलेक्ट्रिक स्कूटर.
‘या’ पाच स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
Avon E Scooter
एव्हॉन ई स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर ६५ किमीची रेंज देऊ शकते. तसेच, त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ६-८ तास लागतात. या स्कूटरचा टॉप स्पीड २४ किमी प्रतितास आहे. या ई स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ४५,००० ठेवण्यात आली आहे.
(हे ही वाचा : इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करताय, फक्त ४९९ रुपयांमध्ये बुक करा ‘ही’ हटके फीचर्सवाली स्कूटर, किंमत फक्त…)
Bounce Infinity E
Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन व्हेरियंट बाजारात दाखल झाले आहेत. या स्कूटरमध्ये 2kWh 48V बॅटरी देण्यात आली आहे. पॉवर मोडमध्ये टॉप स्पीड ६५kmph पर्यंत जाऊ शकतो. त्याच वेळी, इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर ८५ किमीची रेंज मिळते. याशिवाय, बॅटरी पॅकसह व्हेरिएंटची किंमत ४५,०९९ रुपये आहे. त्याच वेळी, बॅटरी पॅकसह व्हेरिएंट ६८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Hero Electric Flash
हिरो इलेक्ट्रिक फ्लॅशचे कंपनीने दोन प्रकार – LX VRLA आणि Flash LX बाजारात लॉन्च केले आहेत. हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश पूर्ण चार्ज केल्यावर ८५ किमीची रेंज देऊ शकते. हिरो इलेक्ट्रिक फ्लॅशच्या व्हेरिएंटची किंमत ४६,६४० रुपयांपासून सुरू होते आणि ५९,६४० रुपयांपर्यंत जाते.
(हे ही वाचा : कार घेण्याचा विचार करताय, सिंगल चार्जमध्ये २०० किमी धावणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार, फक्त २ हजार रुपयांमध्ये बुक करा )
Ampere Electric Scooter
भारतातील स्वस्त आणि सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटरः अँपियरची ४८ V-24Ah ची बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे ८ ते १० तासांचा कालावधी घेते. ही स्कूटर ताशी २५ किमी वेगाने धावू शकते. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ४५ ते ५० किमी पर्यंत जाऊ शकते. भारतीय बाजारपेठेतील त्याची किंमत ३७,४८८ रुपयांपर्यंत आहे. हे काळ्या, लाल आणि ग्रे रंगात उपलब्ध आहे.
Ujaas eGO Electric Scooter
Ujaas eGO इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये २५०W मोटर आणि ४८V-२६Ah बॅटरी दिली असून ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ६-७ तास लागतात. फुल चार्ज केल्यावर ती ६० किमी चालू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ३४,८८० रुपये (एक्स-शोरूम) आहे.