Safest Car In India: टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही लाँच केली होती. टाटाची ही खेळी योग्य ठिकाणावर लागली आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटा पंच (Tata Punch) एसयूव्हीला लाँच केले होते. या कारला ग्राहकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. याला ग्राहकांचा इतका जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे की, याच्या विक्रीने एक रेकॉर्ड बनवला आहे. या एसयूव्हीची शानदार विक्री होत आहे. यातच मारुती आणि टाटाच्या कारमध्ये जबरदस्त स्पर्धा दिसत आहे. टाटा पंच भारतीय बाजारपेठेत Mahindra KUV100 NXT आणि मारुती इग्निसशी स्पर्धा करते. जर तुम्ही सुद्धा टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला या कारच्या फीचर्सबद्दल सर्वकाही माहिती देणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शक्तिशाली इंजिन

टाटा पंच कंपनीच्या ALFA (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले आहे. त्याच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात १.२ लीटर ३ सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे ८५ bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. हे ५ स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह दिले जाते. टाटा पंचला इको आणि सिटी सारखे २ ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात. त्याच वेळी, सुरक्षेच्या बाबतीत, त्याला ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश सेफ्टी टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.

(हे ही वाचा : संधी सोडू नका! Mahindra Thar अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा, जाणून घ्या सविस्तर )

जबरदस्त लुक आणि फीचर्स

टाटा पंचचे बाह्य आणि आतील भागही नेत्रदीपक आहेत. त्याचा मागील आणि पुढचा लुक बर्‍यापैकी मस्कुलर आहे, म्हणून तो आकाराने लहान असला तरी तो खूप शक्तिशाली दिसतो. फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, टाटा पंचमध्ये ७-इंच हर्मन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, iRA कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ९० डिग्री उघडणारे दरवाजे, ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर, क्रूज कंट्रोल, १६-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील आहेत. विशेष फीचर्स आहेत, जी लोकांना खूप आवडतील.

Tata Punch किंमत

टाटा पंचची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते. ९.५४ लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत जाते. यात ५ लोकांना बसण्याची क्षमता आहे.