किआ इंडियाने आपली लोकप्रिय सब-4 मीटर 2024 Kia Sonet sub-compact SUV नवीन अवतारात देशात दाखल केली आहे. कंपनीने 2024 Sonet SUV ची सुरुवातीची किंमत ७.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कोरियन कंपनीने आधीच २५ हजार रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग सुरू केले होते आणि ते डीलरशिपपर्यंत पोहोचू लागले आहे. Kia ने नवीन Sonet च्या डिझाईन मध्ये काही बदल केले आहेत. ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक वैशिष्ट्ये आणि ADAS तंत्रज्ञानासह ऑफर केलेली SUV बनली आहे. ही कार बाजारात दाखल होताच टाटा नेक्साॅनचे धाबे दणाणले आहेत.

नव्या कारमध्ये काय असेल खास?

नवीन सोनेट आता ३६०-डिग्री कॅमेरा, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स टेक्निक (ADAS) सारख्या २५ सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. १४ डिसेंबर रोजी, कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV Sonet चे फेसलिफ्ट मॉडेलचे अनावरण केले. कंपनीने ही SUV नऊ रंगांच्या पर्यायांसह सादर केली आहे.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Most robotic surgeries performed by Tata hospital in shortest time
टाटा रुग्णालयाकडून कमी कालावधीत सर्वाधिक रोबोटिक शस्त्रक्रिया
Unauthorized parking lots, dhabas, Dronagiri,
उरण : द्रोणागिरी, पुष्पकनगरमध्ये अनधिकृत वाहनतळ, ढाबे
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
new maruti suzuki dzire trends pre bookings open varients and features new dzire on google trends
मारुतीचा मोठा धमाका! फक्त ११,००० मध्ये प्री-बूक करा ‘ही’ नवीकोरी कार, व्हेरियंट्स अन् फिचर्स पाहून व्हाल फिदा

डिझाइन

जर आपण डिझाइनबद्दल बोललो तर, कंपनीने नवीन सोनेटला पूर्वीपेक्षा अधिक शार्प आणि स्टाइलिश बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एलईडी हेडलॅम्प दोन्ही कोपऱ्यांवर उपलब्ध आहेत, जे महिंद्राच्या XUV700 सारखे दिसतात. कारच्या बूट डोअरमध्ये कनेक्टेड लाइट स्ट्रिपही याच्या लूकमध्ये भर घालते. ही कार अधिक आकर्षित दिसू लागली आहे. नवीन Kia Sonet चे केबिन खूपच अपग्रेड केले आहे. डॅशबोर्डवर नवीन १०.२५ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर माहिती डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात नवीन सेल्टोसच्या यूजर इंटरफेससारखे ग्राफिक्स आहेत. केबिनला आता तपकिरी इन्सर्टसह ब्लॅकआउट थीम मिळते.

(हे ही वाचा : Mahindra Thar चा खेळ संपविण्यासाठी देशात दाखल झालेल्या मारुतीच्या कारचा स्वस्त व्हेरिएंट महिन्याभरात बंद )

याशिवाय ७०+ कनेक्टेड कार फीचर्ससह इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, हवेशीर फ्रंट सीट्स, फोर-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ७-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, इन-बिल्ट एअर प्युरिफायर, ३६०-डिग्री कॅमेरा आणि एक व्हॉईस ऑपरेटेड सनरूफ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या SUV मध्ये फ्रंट टक्कर-अव्हॉइडन्स असिस्ट, लीडिंग व्हेईकल डिपार्चर अलर्ट आणि लेन फॉलोइंग असिस्ट यांसारखी लेव्हल १ ADAS फिचर देण्यात आली आहेत.

(हे ही वाचा : मारुतीचा ग्राहकांना दणका! आजपासून सर्व कारच्या किमतीत वाढ; ग्राहकांना मोजावे लागणार जास्त पैसे)

सुरक्षात्मक वैशिष्ट्ये

भारतात रस्ते अपघाताचं प्रमाण अधिक आहे. चालकांच्या चुकीमुळे हे अपघात होतात. असे संभाव्य अपघात रोखता यावेत याकरता या कारमध्ये खास यंत्रणा देण्यात आली आहे. फ्रंट कोल्यूजन वॉर्निंग, फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट, लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट यंत्रणांमुळे रस्ते अपघात रोखता येतील आणि अपघातांमुळे होणारे मृत्यूंचही प्रमाण कमी होऊ शकेल. तसंच, एकाच लेनमध्ये चालकाने गाडी चालवण्याकरता लागणारी लेन फॉलोइंग असिस्ट यंत्रणाही या गाडीत बसवण्यात आली आहे. या कारमध्ये अशाप्रकारे जवळपास १० सर्वोत्तम फीचर्स देण्यात आले असून २५ पेक्षा जास्त सुरक्षात्मक वैशिष्ट्येही ग्राहकांसाठी देण्यात आली आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे.

इंजिन

नवीन सोनेटमध्ये विद्यमान मॉडेलची अनेक इंजिने आणि ट्रान्समिशन कायम ठेवण्यात आले आहेत. एंट्री-लेव्हल वेरिएंटमध्ये ८२bhp पॉवर आणि ११५Nm टॉर्क असलेले १.२-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ११८bhp पॉवर आणि १७२Nm टॉर्कसह १-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय आहे, जो दोन ट्रान्समिशन पर्यायांसह येतो.

याशिवाय, तिसरा पर्याय म्हणजे १.५-लीटर डिझेल इंजिन आहे जे ११४bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामध्ये ६-स्पीड क्लचलेस मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे. कारचे पेट्रोल इंजिन १८.८३ किमी/लीटर मायलेज देईल, तर डिझेल इंजिन २२.३ किमी/लीटर पर्यंत मायलेज देईल, असे कंपनीने नमूद केले आहे.