Maruti Suzuki: भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या वाहनांना देशात प्रचंड पसंती मिळते. मारुती सुझुकी कंपनीने गेल्या वर्षी त्यांची मिड साईज एसयूव्ही मारुती ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) भारतात लाँच केली. मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ग्रँड विटाराने भारतीय बाजारपेठेत लाँच केल्याने खळबळ उडाली आहे. क्रेटा, नेक्सॉन आणि मध्यम आकाराच्या एसयूव्हीच्या बाजारपेठेला पूर्णपणे हादरवल्यानंतर आता कंपनीने या वाहनाची निर्यातही सुरू केली आहे. लॅटिन अमेरिकेत ग्रँड विटाराची निर्यात सुरू झाली आहे. त्याची पहिली खेप लवकरच पाठवली जाईल, अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाने आज गुरुवारी दिली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासह, कंपनी आता लॅटिन अमेरिका, आफ्रिका, पश्चिम आशिया, आसियान आणि त्याच्या शेजारील भागांसह ६० हून अधिक देशांमध्ये निर्यात लक्ष्य करत आहे. आता कंपनीकडून एकूण १७ कारचे एक्सपोर्ट जगातील अनेक देशात होत आहे. भारताची निर्यात वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे मारुती सुझुकी आता आपले आंतरराष्ट्रीय अस्तित्व वाढवण्यात गुंतली आहे. एक्सपोर्ट होणाऱ्या पोर्टफोलियोला ग्रँड विटारा द्वारे वाढवता आहोत. 

(हे ही वाचा : मारुतीच्या 17,362 गाड्यांमध्ये आढळला दोष, ‘या’ गाड्या मागवल्या परत, तुमची कार यात नाही ना? )

Maruti Suzuki Grand Vitara ‘अशी’ आहे खास

ग्रँड विटारा ही एक मिड साईज एसयूव्ही आहे. या कारमध्ये स्लीक आणि मस्क्युलर डिझाईन देण्यात आलं आहे. १७ इंचांचे व्हील्स आणि अनेक फीचर्स दिले आहेत. ही कार एकूण ६ रंगांमध्ये येते. या कारची लांबी ४३६४ मिमी, रुंदी १७९५ मिमी, उंची १६३५ मिमी, व्हीलबेस २६०० मिमी इतका आहे. ही एक ५ सीटर कार आहे. यात ४५ लीटर क्षमतेचा फ्यूल टँक देण्यात आला आहे.

ग्रँड विटारा ही भारतातली सर्वात जास्त मायलेज देणारी एसयूव्ही कार आहे. यात दोन इंजिन पर्याय आहेत. त्यापैकी पहिलं १.५ लीटर माईल्ड हायब्रिड इंजिन आहे, जे आपण अन्य मारुती कार्समध्ये पाहिलं आहे. तर दुसरं १.५ लीटर स्ट्राँग हायब्रिड इंजिन देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The made in india maruti suzuki grand vitara suv is now exported to global markets pdb