देशातली चौथी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी महिंद्रा आणि महिंद्राच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत असते. महिंद्राच्या गाडीबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता असते. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची अनेक वाहनं सुरक्षिततेच्या बाबतीत उत्तम दर्जाच्या असतात. आज आपण अशाच एका महिंद्राच्या कारबद्दल बोलत आहोत जी बाजारात जबरदस्त पसंतीस उतरली आहे. सध्या सध्या, Mahindra Scorpio N  ही खूप मागणी असलेली SUV आहे. ही कार टोयोटा फॉर्च्युनरला थेट टक्कर देण्यासही सक्षम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Mahindra Scorpio N ‘अशी’ आहे खास

महिंद्रा स्कॉर्पिओ एन कारमधील फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यात एलईडी डीआरएल आणि टेललाईट्स मिळतात. यात १८ इंचांचे डायमंड-कट अलॉय व्हील्स, इलेक्ट्रिक सनरूफ, डुअल झोन क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट्स, १२ स्पीकर सोनी साऊंड सिस्टिम. ८ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी अॅपल कारप्ले, अँड्रॉयड ऑटोला सपोर्ट करते. डिझेल इंजिन व्हेरिएंट्समध्ये झिप, झॅप आणि झूम असे ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.

(हे ही वाचा: डिजाइनपासून ते फीचर्समध्ये भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ‘ही’ कार अर्ध्याहून कमी किंमतीत घरी आणा )

६ एअरबॅग्ससह मिळतील सेफ्टी फीचर्स

या एसयूव्हीमधील सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास या कारमध्ये ६ एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, ईएससी आणि फोर डिस्क ब्रेक सिस्टिम देण्यात आली आहे. या कारला सुरक्षेच्या बाबतीत ग्लोबल एनसीएपीने ५ स्टार सेफ्टी रेटिंग दिलं आहे. ही कार महिंद्राच्या चाकण येथील प्लान्टमध्ये बनवण्यात आली आहे.

Mahindra Scorpio N किंमत

महिंद्रा स्कॉर्पिओ एनची किंमत १२.७४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला २४.०५ रुपये मोजावे लागतील.