आज देशातील बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक गाड्या विकल्या जात आहेत, पण काही मोजक्याच कार आहेत ज्या आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या कार भारतीय बाजारात खूप पसंत केल्या जातात. टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत नेहमीच मारुती सुझुकीच्या कारचा बोलबाला पाहायला मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा बहुतेक लोक कमी बजेटमध्ये चांगलं मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असतात आणि यात मारुती सुझुकीच्या कार कधीच मागे पडल्या नाहीत. सर्वांनाच माहीत आहे की, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून दरवर्षी सर्वाधिक गाड्यांची विक्री करते. परवडणारी किंमत, मायलेज, फीचर्स, लुक डिझाईन यामुळे मारुती सुझुकीच्या कार्सना भारतीय बाजारात मोठी मागणी पाहायला मिळते.

आता मारुती सुझुकीच्या स्विफ्टने विक्रीचा नवा विक्रम आपल्या नावी केला आहे. कंपनीने सांगितले की मे २००५ ते मे २०२४ पर्यंत स्विफ्टच्या ३० लाख गाड्यांची विक्री आहे. स्विफ्ट पहिल्यांदा २००५ मध्ये लाँच करण्यात आली होती आणि काही वेळातच या कारने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने लोकांच्या हृदयात तसेच त्यांच्या घरांमध्ये स्थान मिळवले आहे. नुकतीच मारुतीने नवीन स्विफ्ट भारतात लाँच केली आहे.

२००५ पासून आतापर्यंत मारुती स्विफ्टचा प्रवास

मारुती सुझुकीने मे २००५ मध्ये भारतात स्विफ्ट पहिल्यांदा लाँच केली, त्यावेळी या कारची किंमत ३.८७ लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) होती आणि आज २०२४ पर्यंत तिची किंमत दुप्पट झाली आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये स्विफ्टची १० लाख विक्री झाली. यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये स्विफ्टच्या २० लाख गाड्यांची विक्री झाली, तर मे २०२४ पर्यंत स्विफ्टच्या ३० लाख गाड्यांची विक्री झाली. स्विफ्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार आहे.

मारुती स्विफ्ट सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे ज्यात LXi, VXi, VXi (O), ZXi, ZXi+ आणि ZXi+ ड्युअल टोनचा समावेश आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख ते ९.६४ लाख रुपये आहे. कारच्या बेस व्हेरियंटमध्येच अनेक चांगली आणि उपयुक्त वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

स्पोर्टी डिझाइन-ब्लॅक इंटीरियर

डिझाईनच्या बाबतीत, तुम्हाला पुढच्या पिढीतील स्विफ्टचा लुक आवडेल. त्याची रचना स्पोर्टी आहे आणि यात सर्व नवीन ब्लॅक इंटीरियर आहे जे तरुणांना लक्ष्य करते. यात ९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस फोन चार्जर आणि पुश बटण स्टार्ट स्टॉप सारखी वैशिष्ट्ये आहेत. कार सीट स्पोर्टी आहेत. तुम्हाला कारमध्ये खूप चांगली जागा मिळेल. कारमध्ये मागील एसी व्हेंटची सुविधा आहे.

इंजिन आणि पॉवर

नवीन स्विफ्टला १.२L 3 सिलेंडर सौम्य हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळेल जे ८१.६PS ची पॉवर आणि ११२ Nm टॉर्क प्रदान करेल. यात ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची सुविधा असेल. यात एएमटी गिअरबॉक्सचा पर्यायही असेल, खास गोष्ट म्हणजे नवीन स्विफ्टला एका लिटरमध्ये २५.७२ किमी मायलेज मिळतो, असा दावा कंपनीने केला आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The maruti suzuki swift has achieved the milestone of 3 million sales in india pdb