Best 7 Seater Car: गेल्या काही वर्षांत फॅमिली कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह अधिक जागा देखील उपलब्ध असते. मार्केटमध्ये अनेक ७ सीटर कार आहे. मारुती सुझुकीची एर्टिगा सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी ७ सीटर कार आहे. Kia Motors आणि Toyota देखील त्यांच्या गाड्या चांगल्या प्रकारे विकत आहेत. तथापि, फार कमी लोकांना माहित आहे की Hyundai कडे देखाल सात सीटर कार आहे, जी तुम्हाला बेस व्हेरिएंटमधूनच ६ एअरबॅग्ज सारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये देते.
आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत ती म्हणजे Hyundai Alcazar कार आहे. ही एक MPV आहे ज्यामध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात. हे वाहन MG Hector Plus, Tata Safari आणि Mahindra XUV700 शी स्पर्धा करते. ह्युंदाईचे हे वाहन ६ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Alcazar ला समोरील हवेशीर जागा, वायरलेस चार्जर आणि दुसऱ्या रांगेत स्टोरेजसह आर्मरेस्ट मिळते. यामध्ये अॅम्बियंट लाइटिंग, बोस साउंड सिस्टीम, एक मोठा पॅनोरमिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन देखील मिळते.
(हे ही वाचा : मारुतीची सर्वात लोकप्रिय कार मिळतेय ४ लाखात, पाहा कुठे मिळतेय ‘ही’ शानदार डील, मायलेज २२.३६ kmpl )
Hyundai Alcazar मध्ये दमदार इंजिन
कंपनीने ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह सादर केली आहे. यामधील २.० लीटर पेट्रोल इंजिन १५७PS पॉवर आणि १९१Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच या कारचं १.५ लीटर डिझेल इंजिन ११३PS पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतं. हे दोन्ही इंजिन ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायांसह येतात. या कारचं पेट्रोल इंजिन १४.५ किमी प्रति लीटर इतकं मायलेज देतं. तर डिझेल इंजिन १४.२ किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकतं.
Hyundai Alcazar किंमत
बेस मॉडेलसाठी त्याची किंमत १६.७८ लाख रुपये ते टॉप मॉडेलसाठी २१.१३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.