वाहन निर्माता कंपनी रेनॉल्ट इंडिया (Renault India) आपली लोकप्रिय एसयूव्ही रेनॉल्ट डस्टर (Renault Duster) लवकरच भारतात नव्या अवतारात लाँच करणार आहे. नवीन लूकसोबतच या कारमध्ये अनेक फीचर्स अपडेट्सही पाहायला मिळतील, असं बोलले जात आहे. यापूर्वी २०१२ मध्ये ५ सीटर डस्टर लाँच करण्यात आले होते. त्यावेळी ही SUV इतकी लोकप्रिय झाली की ती हिंदी चित्रपटांमध्येही वापरली जाऊ लागली. डस्टरने अनेक वर्षे कार मार्केटवर राज्य केले परंतु कालांतराने ती स्वतःच अपग्रेड करू शकली नाही आणि विक्री घसरल्यामुळे ती बंद करावी लागली. पण आता डस्टर नव्या अवतारात पुन्हा बाजारात येणार असल्याची माहिती आहे.

सूत्रानुसार, यावेळी डस्टर त्याच्या मागील आवृत्तीपेक्षा मोठी आणि चांगली असेल. नवीन अवतार सात सीटर असेल. नवीन रेनॉल्ट डस्टर CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. असं असलं तरी, भारतात परवडणाऱ्या ७ सीटर कारला खूप मागणी आहे. सध्या रेनॉल्टकडे ट्रायबरच्या रूपात परवडणारी ७ सीटर कार आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या सात सीटरच्या जागी डस्टर लाँच केले जाईल, असे मानले जात आहे.

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Mumbai mami film festival marathi news
मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला १९ ऑक्टोबरपासून सुरुवात
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

(हे ही वाचा : ३५ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ६५ किमी; स्वस्तात खरेदी करा ‘या’ बाईक्स अन् स्कूटर, पाहा यादी )

डिझाइनमध्ये नावीन्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेनॉल्ट आपले नवीन डस्टर पूर्णपणे नवीन शैलीत सादर करेल. या वर्षी सणासुदीच्या आधी ते लॉन्च केले जाईल. नवीन डस्टरचे पुढील, बाजू आणि मागील प्रोफाइल पूर्णपणे बदलले जातील. बदल त्याच्या परिमाणांमध्ये देखील दिसू शकतात. या नव्या कारची लांबी चार मीटरपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. पाच मोठ्या आणि दोन लहान मुलांसाठी बसण्याची जागा असेल. पण बूट स्पेसची समस्या असू शकते.

नवीन इंटीरियर, प्रगत वैशिष्ट्ये

नवीन डस्टरच्या इंटिरिअरमध्ये केवळ नवीनपणाच नाही तर काही चांगल्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्याच्या डॅशबोर्डची रचना किगर आणि ट्रायबरसारखी असू शकते. तुम्हाला केबिन गडद आणि बेज रंगात मिळेल.

इंजिन आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये

नवीन डस्टर १.०L आणि १.२ पेट्रोल इंजिनसह लॉन्च केले जाऊ शकते. यात मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सची सुविधा असेल. रेनॉल्टची ही दोन्ही इंजिने कंपनीच्या इतर कारला आधीच पॉवर देतात. ही दोन्ही इंजिने परफॉर्मन्स आणि मायलेजच्या बाबतीत चांगली आहेत. मात्र डस्टरसोबत ते पुन्हा जोडले जातील, असे बोलले जात आहे. सुरक्षिततेसाठी, या कारमध्ये EBD, सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड, हिल असिस्ट आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसह तान पॉइंट सीट बेल्ट यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.

नवीन डस्टरची किंमत आठ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. या कारची थेट स्पर्धा मारुती एर्टिगा आणि किया केरेन्सशी असेल.