जग्‍वार टीसीएस रेसिंगने आज २०२३ एबीबी फिया फॉर्म्‍युला ई वर्ल्‍ड चॅम्पियशनशीपमध्‍ये स्‍पर्धा करण्‍यासाठी डिझाइन व निर्माण करण्‍यात आलेली जग्‍वार आय-टाइप ६ लाँच केली आहे. ज्‍यामुळे ऑल-इलेक्ट्रिक मोटोस्‍पोर्ट श्रेणी नवीन जनरेशन ३ युगामध्‍ये प्रवेश करत आहे. जग्‍वार आय-टाइप ६ आतापर्यंतची सर्वात प्रगत व कार्यक्षम इलेक्ट्रिक जग्‍वार रेस कार आहे. ही फ्रण्‍ट व रिअर पॉवरट्रेन्‍स असलेली पहिली फिया फॉर्म्‍युला ई रेस कार आहे. पुढील बाजूस २५० केडब्‍ल्‍यू रिजेनची भर करण्‍यात आलेली आहे आणि मागील बाजूस ३५० केडब्‍ल्‍यू रिजेनची भर करण्‍यात आली आहे. यामुळे जनरेशन २ मॉडेलच्‍या तुलनेत रिजनरेटिव्‍ह क्षमता दुप्‍पट करण्‍यात आली आहे आणि समकालीन रिअर ब्रेक्‍स काढण्‍यात आले आहेत.

जानेवारी २०२३ मध्‍ये सुरू होणारे फॉर्म्‍युला ई जनरेशन ३ युग जगभरातील रस्‍त्यांवर गतीशील व अधिक उत्‍साहवर्धक व्‍हील-टू-व्‍हील रेसिंग घेऊन येईल. नवीन अत्‍याधुनिक तंत्रज्ञानांमध्‍ये अग्रणी असलेली जग्‍वारच्‍या फॉर्म्‍युला ई रेस कारची तिसरी पिढी नवीन कार्यक्षमता स्‍थापन करेल. यापूर्वीच्‍या कार्सच्‍या तुलनेत ही कार ७४ किलो वजनाने हलकी असण्‍यासोबत १०० केडब्‍ल्‍यू अधिक शक्तिशाली आहे आणि या कारमध्‍ये प्रतितास ३२१ किमीची अधिकतम गती प्राप्‍त करण्‍याची क्षमता आहे.

india census
जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Jewellery worth more than three lakh rupees seized from suspected vehicles in Bhiwandi
भिवंडीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, संशयित वाहनांतून तीन लाखाहून अधिक रुपयांचे दागिने जप्त
indian wrestlers to play upcoming world championships
कुस्तीगिरांचा मार्ग मोकळा! जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागास सरकारचा हिरवा कंदील
Nashik State Transport Department will run extra bus during diwali
दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा
Royal Enfield Goan Classic 350
Royal Enfield Goan Classic 350 नोव्हेंबरमध्ये लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स अन् डिझाइन
upsc exam preparation tips
UPSC ची तयारी : UPSC मुख्य परीक्षा २०२४ – प्रश्नांचे अवलोकन (भाग ३)
Funds to Urban Development Department for Construction of Elevated Road of Rustamji Urbania Housing Complex thane news
रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलाच्या उन्नत मार्गाच्या हालचालींना वेग

नक्की वाचा – चोरट्यांपासून सावधान! तुमची कार हॅक करून लांबूनच करतील स्टार्ट, कसं ते वाचा सविस्तर


जग्‍वार टीसीएस रेसिंग नवीन, वैशिष्‍ट्यपूर्ण ओळखीसह २०२३ सीझनकडे वाटचाल करत आहे. लक्षवेधक कलर पॅलेटमध्‍ये कार्बन ब्‍लॅक, सॅटिन व्‍हाइट व आकर्षक गोल्‍ड अॅसेंट्सचा समावेश आहे. जग्‍वार आय-टाइप ६ लायव्‍हरीची असिमेट्रिक डिझाइन ड्रायव्‍हर्स मिच इव्‍हॅन्‍स व सॅम बर्डसाठी दोन अद्वितीय कार्सची निर्मिती करतात. फॉर्म्‍युला ई मध्‍ये अद्वितीयरित्‍या जग्‍वार ड्राइव्‍हर लाइन-अप तिस-या सलग सीझनसाठी तीच ठेवण्‍यात आली आहे, ज्‍यामधून त्‍यांची बहुमूल्‍य सातत्‍यता दिसून येते. फॉर्म्‍युला ई ची पुढील पिढी जग्‍वार टीसीएस रेसिंग व जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरसाठी रिअल-वर्ल्‍ड परीक्षा घेणारी असणार आहे. टीम वर्ल्‍ड चॅम्पियनशीपमध्‍ये यशस्‍वी ठरण्‍याच्‍या उद्देशाने स्‍पर्धा करण्‍याकरिता नवीन अत्‍याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्‍यासोबत त्‍यामध्‍ये नाविन्‍यता आणते, टीम इलेक्ट्रिक पॉवरट्रेन, स्थिरता व सॉफ्टवेअर तंत्रज्ञानांसाठी महत्त्वपूर्ण रेस-टू-रोड क्षमता देईल.

जग्‍वार आय-टाइप ६ मधील नवोन्‍मेष्‍कार व तंत्रज्ञान २०२५ पासून ऑल-इलेक्ट्रिक मॉडर्न लक्‍झरी ब्रॅण्‍ड म्‍हणून जग्‍वारच्‍या पुनर्कल्‍पनेला सक्षम करतील. शून्‍य-उत्‍सर्जन मोटोस्‍पोर्ट श्रेणीमध्‍ये रेसिंग करणा-या जगातील सर्वात स्थिर रेस कारमधून जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरची शून्‍य टेलपाइप उत्‍सर्जन संपादित करण्‍याप्रती, तसेच रिइमेजिन स्‍ट्रॅटेजीचा भाग म्‍हणून २०३९ पर्यंत पुरवठा साखळी, उत्‍पादने व कार्यसंचालनांमध्‍ये कार्बन नेट झीरो संपादित करण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. नुकतेच सर्वोच्‍च रेटिंग फिया थ्री-स्‍टार एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल अॅक्रेडिएशनसह पुरस्‍कारित करण्‍यात आलेली जग्‍वार टीसीएस रेसिंग २०२३ सीझनमध्‍ये प्रवेश करत आहे. यामधून पुष्‍टी मिळते की, टीम पर्यावरणीय व्‍यवस्‍थापनाप्रती सर्वोत्तम पद्धती व कटिबद्धतेला दाखवण्‍यासोबत सातत्‍याने विद्यमान प्रक्रिया सुधारण्‍याचा प्रयत्‍न करते.

नक्की वाचा – Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!

२०२३ चॅम्पियनशीपपूर्वी वोल्‍फस्‍पीडला ऑफिशियल पॉवर सेमीकंडक्‍टर पार्टनर म्‍हणून निवडण्‍यात आले आहे. या सहयोग वोल्‍फस्‍पीडचे २०१७ पासून टीमसोबतच्‍या विद्यमान संबंधाला पुढे घेऊन जातो, जेथे त्‍यांचे प्रगत सिलिकॉन कार्बाइड तंत्रज्ञान ऑन-ट्रॅक कार्यक्षमता व कामगिरी सुधारण्‍यासाठी वापरण्‍यात आले आहे. तसेच जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरने देखील नुकतेच वोल्‍फस्‍पीडसोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. या सहयोगामधून इलेक्ट्रिक वेईकल इन्‍वर्टर्सच्‍या पुढील पिढीसाठी सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्‍टर्सच्‍या पुरवठ्याची खात्री मिळते. दोन यशस्‍वी वर्षांनंतर मायक्रो फोकस ऑफिशियल टेक्निकल पार्टनर म्‍हणून त्‍यांच्‍या भागीदारीचे नूतनीकरण करत आहे. त्‍यांचे जागतिक दर्जाचे सॉफ्टवेअर व सेवा जसे आयडॉल व वर्टिका अॅनालिटिक्‍स प्‍लॅटफॉर्म टीमच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये समावेश करण्‍यात आले आहेत. ज्‍यामुळे त्‍यांना व्‍यापक डेटा गोळा करण्‍यासोबत त्‍यांची प्रक्रिया करता येते, रेस दरम्‍यान अधिक अचूक अंदाज व वेळेत निर्णय घेता येतात.

यामुळे टीमसाठी अधिक पॉइंट्स, पोडियम्‍स व विजयाची खात्री मिळते. वोल्‍फस्‍पीड व मायक्रो फोकसने जागतिक दर्जाच्‍या भागीदारांच्‍या विद्यमान पोर्टफोलिओमध्‍ये समावेश केला आहे. या पोर्टफोलिओमध्‍ये जागतिक आयटी सेवा, सल्‍लागार व व्‍यवसाय सोल्‍यूशन्‍स कंपनी टाटा कन्‍सल्‍टण्‍सी सर्विसेस (टीसीएस)चा समावेश आहे. ज्यांनी टीमचे बहुवार्षिक टायटल स्‍पॉन्‍सरशिप सुरू ठेवले आहे. तसेच जग्‍वार टीसीएस रेसिंगसाठी कार्यक्षमता व नवोन्‍मेष्‍काराचा शोध घेण्‍यामध्‍ये जीकेएन ऑटोमोटिव्‍ह, डाऊ व कॅस्‍ट्रॉल आणि पुरवठादार अल्‍पाइनस्‍टार्स व अनकॉमन संलग्‍न झाले आहेत. हा पहिलाच सीझन आहे, जेथे जग्‍वार सहयोगी ब्रिटीश-स्थित टीम एनव्हिजन रेसिंगला त्‍यांच्‍या यशस्‍वी पॉवरट्रेन तंत्रज्ञानाचा पुरवठा करणार आहे. म्‍हणजेच ग्रिडवर चार जग्‍वार समर्थित फॉर्म्‍युला कार्स असणार आहेत.

जग्‍वार टीसीएस रेसिंग १२ शहरांमधील १७ रेसेसपैकी प्रथम १४ जानेवारी २०२३ रोजी मेक्सिको सिटीमध्‍ये रेस करेल. मिच इव्‍हॅन्‍स ड्रायव्‍हर्स वर्ल्‍ड चॅम्पियनशीपमध्‍ये उपविजेते ठरलेल्‍या फॉर्म्‍युला ई मधील मागील सीझनमध्‍ये जग्‍वार टीसीएस रेसिंगने सर्वोच्‍च पॉइण्ट्स संपादित केल्‍यानंतर ब्रिटीश टीम २०२३ मध्‍ये वर्ल्‍ड चॅम्पियनशीप टायटलसाठी पुन्‍हा एकदा अथक मेहनत घेत आहे. जग्‍वार टीसीएस रेसिंग टीम प्रिन्सिपल जेम्‍स बार्क्‍ले म्‍हणाले, “लॉन्‍च दिवस जग्‍वार टीसीएस रेसिंगसाठी अभिमानास्‍पद व उत्‍सावर्धक क्षण आहे आणि यंदाचे वर्ष अधिक खास आहे, कारण आम्‍ही फॉर्म्‍युला ई च्‍या जनरेशन ३ युगामध्‍ये प्रवेश करत आहोत.’’

नक्की वाचा – Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत!


“सीझन ९ नवीन ऑल-इलेक्ट्रिक रेस कार जग्‍वर आय-टाइप ६ आणि कॅलेंडरमध्‍ये भर करण्‍यात आलेलया नवीन प्रख्‍यात शहरांसह आतापर्यंतचा सर्वात स्‍पर्धात्‍मक व रोमांचक सीझन असणार आहे. आमच्‍या नवीन टीम डिझाइनने कारला जग्‍वारसाठी आमच्‍या आधुनिक लक्‍झरी दृष्टिकोनाशी सुसंगता राखत कलाकृतीमध्‍ये बदलले आहे. “आम्‍हाला आमचा ऑफिशियल पॉवर सेमीकंडक्‍टर पार्टनर म्‍हणून टीममध्‍ये वोल्‍फस्‍पीडचे स्‍वागत करण्‍याचा अत्‍यंत आनंद होत होत आहे. त्‍यांचे सिलिकॉन कार्बाइड तंत्रज्ञानामधील कौशल्‍य आमच्‍या पॉवरट्रेन कार्यक्षमतेमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”

• नवीन जग्‍वार आय-टाइप ६ ही २०२३ एबीबी फिया फॉर्म्‍युला ई वर्ल्‍ड चॅम्पियनशीप जिंकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली आतापर्यंतची सर्वात प्रगत व कार्यक्षम इलेक्ट्रिक जग्‍वार रेस कार आहे.
• वजनाने हलकी, अधिक शक्तिशाली व गतीशील जग्‍वार आय-टाइप ६ प्रतितास २०० मैलसह ऑल-इलेक्ट्रिक रेस कारसाठी नवीन कार्यक्षमता स्थापन करेल.
• जग्‍वार आय-टाइप ६ मध्‍ये असलेले रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग इतके शक्तिशाली आहे की त्‍यामध्‍ये समकालीन रिअर ब्रेक्‍स नाहीत.
• जग्‍वार आय-टाइप ६ मधील तंत्रज्ञान २०२५ पासून ऑल-इलेक्ट्रिक मॉडर्न लक्‍झरी ब्रॅण्‍ड म्‍हणून जग्‍वारच्‍या भवितव्‍याची पुनर्कल्‍पना करण्‍यामध्‍ये साह्य करेल.
• जग्‍वारच्‍या क्रिएटिव्‍ह टीमच्‍या नवीन असिमेट्रिक लायव्‍हरीमधून ड्रायव्‍हर्ससाठी अद्वितीय कार्स आणि जनरेशन ३ युगासाठी वैशिष्‍ट्यपूर्ण नवीन ओळख मिळते.
• गेल्‍या वर्षी जग्‍वार टीसीएस रेसिंगने फॉर्म्‍युला ई मध्‍ये सर्वाधिक पॉइण्‍ट्स मिळवल्‍यानंतर ड्रायव्‍हर्स मिच इव्‍हॅन्‍स व सॅम बर्ड पुन्‍हा एकदा सातत्‍यता राखण्‍यास उत्‍सुक आहेत.
• जग्‍वार टीसीएस रेसिंगने सर्वोच्‍च रेटिंग फिया थ्री-स्‍टार एन्‍व्‍हारोन्‍मेंटल अॅक्रेडिएशनसह सीझन ९ मध्‍ये प्रवेश करत आहे, ज्‍यामधून टीमची स्थिरतेप्रती कटिबद्धता दिसून येते.
• नवीन सीझनमध्‍ये नवीन भागीदाराचे स्‍वागत, जेथे वोल्‍फस्‍पीड ऑफिशियल पॉवर सेमीकंडक्‍टर पार्टनर म्‍हणून टीममध्‍ये सामील होत आहे.
• जग्‍वार टीसीएस रेसिंग १२ शहरांमधील १७ रेसेसपैकी प्रथम १४ जानेवारी २०२३ रोजी मेक्सिको सिटीमध्‍ये रेस करेल. जग्‍वार टीसीएस रेसिंग ११ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतातील हैदराबादमध्‍ये रेस करेल.