Simple One e-scooter launched: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन स्टार्ट अप कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक व्हीकल्सला ग्राहकांसाठी लाँच करीत आहेत. त्यातच आता बेंगळुरू येथील कंपनी Simple Energy ने आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर देशात सादर केली आहे. कंपनीने Simple One e-scooterच्या किमती अधिकृतपणे जाहीर केल्या. स्पोर्टी लूक आणि मजबूत बॅटरी पॅक असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल, कंपनीचा दावा आहे की ती त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक ड्रायव्हिंग रेंज देते. सिंपल वन ई-स्कूटर ६ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
१ लाखाहून अधिक प्री-बुकिंग्ज
गेल्या १८ महिन्यांत सिंपल वनच्या १ लाखाहून अधिक प्री-बुकिंग्ज मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी ६ जून २०२३ पासून बेंगळुरूमध्ये सुरू होईल. निर्मात्याची ई-स्कूटर टप्प्याटप्प्याने वितरित करण्याची योजना आहे. सिंपल एनर्जीने ऑगस्ट २०२१ मध्ये पहिल्यांदाच सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले. हे मॉडेल उत्पादनात आणण्यासाठी कंपनीला दीड वर्षाहून अधिक काळ लागला आहे.
सिंपल वन एका चार्जवर २१२ किमी (IDC) च्या रेंजचा दावा करते. कंपनीने यापूर्वी एका चार्जवर २३६ किमीचा दावा केला होता. तरीही, हे मॉडेल देशातील सर्वात लांब श्रेणीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
(हे ही वाचा: Tata Nano चा सर्वात स्वस्त अवतार देशात दाखल, बुकींगही सुरु, खरेदीसाठी हजारो ग्राहक रांगेत, किंमत फक्त… )
बॅटरी पॉवर
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरला ५ kWh चा बॅटरी पॅक मिळतो, जो आधी घोषित केलेल्या ४.८ kWh बॅटरी पॅकपेक्षा थोडा मोठा आहे. बॅटरी ७-लेयर संरक्षण प्रणालीचे वचन देते ज्यामध्ये इन-हाउस विकसित बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) आणि IP-67 अनुपालन आहे. कंपनीने स्पष्ट केले की गेल्या वर्षी घोषित केलेल्या AIS १५६ सुधारणांची पूर्तता करण्यासाठी बॅटरीचा आकार वाढवावा लागेल.
बॅटरी चार्जिंग
ई-स्कूटर ७५० वॅटच्या होम चार्जरने ५ तास ५४ मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज करता येते. हा चार्जर सप्टेंबरपासून उपलब्ध होईल, असे कंपनीने म्हटले आहे. वेगवान चार्जिंग देखील आहे जे प्रति मिनिट १.५ किमी वेगाने बॅटरी चार्ज करू शकते. म्हणजेच दर एक मिनिटाला चार्ज केल्यानंतर स्कूटर १.५ किमी धावू शकते.
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज
सर्व बदलांसह, सिंपल वनचे वजन आता १३४ किलोग्रॅम आहे, जे आधी दाखवलेल्या प्रोटोटाइपच्या तुलनेत वाढले आहे. मॉडेल ८.5५ kW (11.3 bhp) पीक पॉवर आणि ४.५ kW (६ bhp) सतत पॉवर वितरणासह PMS मिड-ड्राइव्ह मोटर वापरते. त्याचा पीक टॉर्क ७२ एनएम आहे. सिंपल वन फक्त २.७७ सेकंदात ९ ते ४० किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम असल्याचा दावा करतो. त्याचा टॉप स्पीड १०५ किमी प्रतितास आहे. ही ई-स्कूटर ट्यूबलर स्टील फ्रेमवर बनवण्यात आली आहे. यात इको, राइड, डॅश आणि सोनिक असे चार राइडिंग मोड आहेत.
(हे ही वाचा: KTM RC 200 चे वर्चस्व संपणार? Yamaha ने भारतात दाखल केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत…)
वैशिष्ट्ये
सिंपल वनला ओपन-सोर्स अँड्रॉइड ओएससह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो आणि टेलिमॅटिक्स, राइड स्टॅटिस्टिक्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पार्क असिस्ट आणि बरेच काही यासारख्या वैशिष्ट्यांसह येतो.
किंमत किती आहे?
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १.४५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १.५८ लाख रुपयांपर्यंत जाते. या सर्व किमती एक्स-शोरूम बेंगळुरू आहेत. ७५०W पोर्टेबल चार्जरसाठी ग्राहकांना अतिरिक्त १३,००० रुपये द्यावे लागतील. किमती १ जून २०२३ पासून लागू होणार्या सुधारित FAME II सबसिडी योजनेच्या अनुषंगाने आहेत.