जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा जगभरात आपलं स्थान निर्माण करत आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर नोव्हेंबर २०२२ मध्ये जागतिक स्तरावर तिच्या नवीन-जनरल इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला इंडोनेशियन बाजारात ‘इनोव्हा झेनिक्स’ म्हणून ओळखले जाईल. चला जाणून घेऊया टोयोटाच्या या नवीन कारची वैशिष्ट्ये… 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इनोव्हा हायक्रॉसचे फीचर्स

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस इंडोनेशियामध्ये इनोव्हा झेनिक्सच्या Innova Zenix रुपात लॉन्च केले जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार ही नवीन MPV २.0L पेट्रोल आणि २.0L पेट्रोल स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन पर्यायांसह लॉन्च केली जाईल. ही इनोव्हा फीचर्सने परिपूर्ण असेल. नवीन इनोव्हा हायक्रॉसचा आकार खूपच मोठा आणि आलिशान असेल. ही कार हायब्रिड व्हर्जन म्हणून सादर करण्यात येईल. ज्यामध्ये 2.0L पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर मिळेल. तसेच एक मानक 2.0L पेट्रोल इंजिन प्रकार देखील उपलब्ध असणार आहे. मानक पेट्रोल प्रकार देखील इनोव्हा क्रिस्टलच्या 2.7L पेट्रोल इंजिन युनिटपेक्षा अधिक कार्यक्षम असेल. परंतु, हायब्रिड व्हर्जन अधिक इंधन कार्यक्षम असेल.

आणखी वाचा : Honda Discount Offers in October: सणासुदीच्या काळात ‘या’ कारवर कंपनी देत आहे भरघोस सूट! जाणून घ्या कोणत्या मॉडेलवर किती रुपयांचा डिस्काऊंट

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची तुलना करून इनोव्हा डिझेल निवडणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय असेल. हायब्रीड इनोव्हा हायक्रॉसचा उद्देश इंधन खर्च कमी करण्याचा आहे. या नवीन कारमध्ये सनरूफ, प्रीमियम ऑडिओ सिस्टीम, हवेशीर जागा, मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.