Tata Nexon Jet Edition Discontinued in India: टाटा मोटर्स कंपनीने भारतीय ग्राहकांना दुहेरी धक्का दिला आहे. अलिकडेच कंपनीने त्यांची सर्वात स्वस्त आणि सर्वात सुरक्षित एसयूव्ही टाटा पंच या कारचं एक व्हेरिएंट बंद केलं आहे. कंपनीने पंच या कारचं टॉप स्पेक काझीरंगा एडिशन त्यांच्या वेबसाईटवरून हटवलं आहे. टाटाची सर्वाधिक मागणी असलेली SUV Nexon देखील जेट प्रकारात लाँच करण्यात आली होती, जी आता कंपनीने तिच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकली आहे. टाटा मोटर्सने त्यांची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही नेक्सॉनची जेट एडिशन बंद केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून हटवलं आहे.

नेक्सॉन जेट एडिशन किंमत

टाटा नेक्सॉन जेट एडिशन, ऑगस्ट २०२२ मध्ये लाँच करण्यात आले होते, ते पहिल्या क्रमांकावर होते. Nexon Jet Edition ची किंमत पेट्रोल मॅन्युअलसाठी १२.१३ लाख रुपये ते डिझेल AMT साठी १४.०८ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय

(हे ही वाचा : जबरदस्त मायलेज अन् किंमतही अगदी कमी ‘या’ ५ लोकप्रिय कार तुम्हाला येत्या एका महिन्यात खरेदी करता येणार नाही )

नेक्सॉन जेट एडिशन बंद

टाटाने नेक्सॉनचे जेट व्हेरियंटही फारसा गाजावाजा न करता शांतपणे बंद केले आहे. Tata Nexon Jet Edition पेट्रोलमध्ये XZ+ ट्रिम तसेच डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर करण्यात आली होती. मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स दोन्ही ऑफरवर होते. आता, नेक्सॉन जेट एडिशन बंद करण्यात आले आहे. कंपनीने Tata Nexon SUV चे प्रकार बदलले आहेत, कंपनीने XZ+ (HS) ट्रिमला XZ+ (S) व्हेरियंटसह आणि XZ+ (L) आणि (P) प्रकारांना XZ+ LUX आणि LUXS व्हेरियंटसह बदलले आहे.

Tata Nexon च्या किमतीत वाढ

अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत आपल्या Nexon कॉम्पॅक्ट SUV च्या किमती वाढवल्या आहेत. आता एसयूव्हीचे निवडक पेट्रोल आणि डिझेल प्रकार आता १५,००० रुपयांनी महागले आहेत. ऑटोमेकरने टाटा नेक्‍सॉनच्‍या किंमतीत चौथ्यांदा वाढ केली आहे. यापूर्वी, कंपनीने जुलै आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये किंमत वाढवली होती.

Story img Loader