सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या देशांच्या यादीत भारत सर्वांत वर असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यांनी देशातील रस्त्यांवर चांगल्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षित वाहनांच्या गरजेवरही भर दिला आहे. याआधीही नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की प्रवासी वाहनांमध्ये एअरबॅगची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
गडकरींनी यापूर्वी सूचित केले होते की कारच्या कोणत्याही मॉडेलच्या सर्व प्रकारांमध्ये कारमधील सहा एअरबॅग्ज अनिवार्य केल्या जाऊ शकतात. या आठवड्याच्या सुरुवातीला, गडकरींनी लोकसभेत सांगितले की या नियमामुळे रस्ते अपघातामध्ये जास्तीत जास्त जीव वाचवण्यात यश येऊ शकते. सरकार लवकरच प्रत्येक कारमध्ये किमान सहा एअरबॅग अनिवार्य करणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या काही महिन्यांत जारी होऊ शकते.
भारत पुढील वर्षापर्यंत वाहनांसाठी सुरक्षा रेटिंग चाचणी करणारी भारत एनसीएपी ही संस्था सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे. असे मानले जाते की जर कारमधील एअरबॅगची संख्या वाढविली गेली तर यामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. तथापि, सुरक्षेला प्राधान्य देण्यावर संसदेत सर्वांचे एकमत झाले आहे.
गडकरींनी सांगितले की, भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख रस्ते अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. आतापर्यंत कार दोन एअरबॅगसह येत होत्या. मागे बसलेल्या लोकांसाठी एअरबॅग नसतात. ते पुढे म्हणाले, “आमचा विभाग कारमध्ये बसणाऱ्या मागील प्रवाशांसाठी एअरबॅग्ज ठेवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून दुर्घटनेच्यादरम्यान मागे बसणाऱ्या प्रवाशांचे प्राण वाचू शकतील.”
एअरबॅग कशा पद्धतीने काम करते?
जेव्हा एखादी वेगाने धावणारी गाडी एखाद्या गोष्टीला धडकते तेव्हा तिचा वेग लगेच कमी होतो. एक्सेलेरोमीटर वेगात अचानक झालेला हा बदल लक्षात घेतो. यानंतर एक्सेलेरोमीटर एअरबॅगच्या सर्किटमध्ये लागलेले सेन्सर अॅक्टिव्हेट करतो. एअरबॅगचे सेन्सर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर त्याला हिट सेन्सॉर्सच्या मदतीने विद्युतप्रवाह मिळतो. यानंतर एअरबॅगमध्ये केमिकलचा स्फोट होतो. स्फोट झाल्यानंतर एअरबॅगमध्ये गॅस तयार होऊ लागतो. यामुळे ही बॅग अवघ्या काही क्षणांमध्ये फुगण्यास सुरुवात होते. ही बॅग चालक आणि इतर प्रवाशांना अपघातात गंभीर जखमी होण्यापासून वाचवते.
पण फक्त एअरबॅग वाहनातील प्रवाशांना वाचवू शकत नाही. यावेळी चालक आणि प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेलं असणंही तितकंच महत्वाचं आहे.
एक एअरबॅगची किंमत किती?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये आहे. ते म्हणाले की, एअरबॅगची किंमत फक्त ८०० रुपये आहे. कंपनी मात्र यावर १५ हजार रुपये आकारत आहेत. नितीन गडकरी यांच्या मते, एका एअर बॅगची किंमत ८०० रुपये आणि चार एअरबॅगची किंमत ३२०० रुपये आहे. यासोबत जर काही सेन्सर्स आणि सपोर्टिंग अॅक्सेसरीज बसवल्या तर एअरबॅगची किंमत ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. त्यानुसार एअरबॅग बसवण्याची किंमत १३०० रुपये असू शकते. म्हणजेच चार एअरबॅग्सची किंमत ५२०० पर्यंत जाऊ शकते.