Hyundai Verna 2023: दक्षिण कोरियाची ऑटोमोटिव्ह कंपनी ह्युंदाई आपली नेक्स्ट जनरेशन ‘Hyundai Verna’ लवकरच लाँच करणार आहे. पण लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या Hyundai Verna च्या बाह्य डिझाईनचे स्केच जारी केले आहे, ज्यामध्ये ही सेडान अगदी नवीन लूकमध्ये आणखी स्पोर्टी दिसते.

Hyundai Verna 2023 डिझाइन

नवीन पिढीतील Hyundai Verna मध्ये आकर्षक डिझाईन लँग्वेज असेल. कंपनीच्या नवीन ‘सेन्स स्पोर्ट मी’ डिझाईन तत्त्वज्ञानावर आधारित, नवीन व्हर्नामध्ये दोन्ही बाजूंना स्प्लिट एलईडी हेडलाइट्सने फ्लँक केलेले मोठे लोखंडी जाळीचे वैशिष्ट्य असेल. सेडानमध्ये बोनेटच्या बाजूने चालणारा एलईडी लाइट बार तसेच शार्प बंपर आणि बॉडी लाईन्सवर कट्स आणि क्रिझ असतील. यात स्लोपिंग रूफलाइन आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स असतील.

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट

(हे ही वाचा : दमदार बॅटरी अन् मोठ्या ड्रायविंग रेंजसह ‘Okaya Faast F2F’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत फक्त… )

2023 Hyundai Verna इंजिन आणि ट्रांसमिशन

2023 Hyundai Verna मध्ये ६-स्पीड MT आणि ७-स्पीड DCT शी जोडलेले नवीन १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. यात १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर देखील मिळेल जी ६-स्पीड एमटी आणि IVT मध्ये येईल. दोन्ही इंजिन पर्याय RDE-अनुरूप आणि E२० इंधन असलेले आहेत. ही फक्त पेट्रोलची सेडान असेल आणि त्यात डिझेल इंजिन नसेल.

लाँच होण्याआधीच Hyundai Verna 2023 ची प्री बुकींग सुरू

कंपनी २१ मार्च २०२३ राेजी आपली नेक्स्ट जनरेशन Hyundai Verna लाँच करण्याच्या तयारीत आहे. लाँच होण्याआधीच दक्षिण कोरियाच्या या ऑटोमोटिव्ह कंपनीने Hyundai Verna 2023 मॉडेलचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक जवळच्या Hyundai च्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपला भेट देऊन २५,००० रुपयांची बुकिंग रक्कम भरून ही सेडान बुक करू शकतात.

Hyundai Verna 2023 किंमत

न्यू जनरेशन Hyundai Verna चार ट्रिम्स EX, S, SX आणि SX(O) मध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये ग्राहकांना Abyss Black (नवीन), Atlas White (नवीन), Tellurian Brown या रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. सेडानच्या किमती रु. १०.५ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. लाँच झाल्यावर सेडान Volkswagen Virtus, Skoda Slavia, Maruti Suzuki Ciaz आणि the आगामी Honda City शी स्पर्धा करेल.

Story img Loader