सध्या पावसाळा सुरू असून सगळीकडे रस्ते जलमय झाले आहेत. पावसाळ्यात गाडीच्या काचा किंवा बाहेरील आरशांवर पाणी राहते ज्यामुळे दिसणे कठीण होते. पावसात सर्वांत मोठी अडचण होते ती चारचाकी आणि दुचाकींची. यावेळी वाहन चालवताना फार काळजी घ्यावी लागते.
पावसात कार चालवणे अवघड होते कारण पावसात दृश्यमानता कमी असते आणि कमी दृश्यमानतेत गाडी चालवताना अधिक काळजी घेण्याची गरज असते. अनेक लोक पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार अॅक्सेसरीजचा वापर करतात, जसे की, वॉटर रिपेलेंट, अँटी-फॉग स्प्रे आणि गाड्यांच्या काचांवर पाणी साचू नये म्हणून धुकेविरोधी फिल्म इत्यादी…पण, आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत, जी खूपच स्वस्त आहे आणि तुमच्या कारच्या आरशांवर किंवा ORVM वर पाणी थांबू देणार नाही. यासाठी तुम्हाला बटाटे वापरावे लागतील. होय, हे खरं आहे. बटाटा पावसाचे पाणी गाडीच्या विंडशील्ड आणि ORVM वर साचण्यापासून रोखू शकतो. बटाट्याला नैसर्गिक आवरण असते, ज्यावर पाणी थांबत नाही.
(हे ही वाचा : भारतात पांढऱ्याच कारची क्रेझ का? ‘ति’च्यासाठी महिनाभर वेटींगवर का राहतो ग्राहक? कारण जाणून व्हाल थक्क )
यासाठी आधी बटाटा मधूनच कापावा लागेल. त्यानंतर, त्याचा कापलेला भाग गाडीच्या ORVM वर थोडा वेळ घासावा लागेल. यामुळे ORVM वर नैसर्गिक आवरण तयार होईल, ज्यावर पावसाचे पाणी थांबणार नाही. त्यामुळे दृश्यमानता चांगली राहील आणि चांगली दृश्यमानता असल्याने पावसातही वाहन चालवणे सोपे होणार आहे.
त्याचप्रमाणे, आपण कारच्या विंडशील्डवर बटाटे वापरू शकता. परंतु, जर कारच्या विंडशील्डचे क्षेत्रफळ जास्त असेल तर ते तेथे वापरणे कठीण होईल. त्यासाठी तुम्हाला अनेक बटाटे लागतील, जे डोकेदुखीसारखे असेल. म्हणूनच, तुम्ही खिडकीच्या काचांसाठी वॉटर रिपेलेंट, अँटी-फॉग स्प्रे आणि अँटी-फॉग फिल्म इत्यादींचा वापरही करु शकता.
कारच्या ORVM वर बटाटे लावल्याने फायदे
हे कारच्या काचेवर पाणी साचण्यास प्रतिबंध करते आणि चांगली दृश्यमानता देते.
पावसातही गाडी चालवणे सोपे होते.
हा एक स्वस्त आणि सोपा उपाय आहे.