Electric Motorcycle: ऑटो क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस विकास होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय टू व्हीलर सेगमेंटचे विस्तारीकरण जलद गतीने होत आहे. इलेक्ट्रिक बाईकची संख्यासुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यात आता आणखी एक नव्या बाईकचा समावेश होणार आहे. हैदराबाद स्थित स्टार्टअप टू-व्हीलर कंपनी Pure EV भारतीय बाजारपेठेत आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लवकरच लाँच करणार आहे.
‘ही’ इलेक्ट्रिक बाईक घालणार धुमाकूळ
टू-व्हीलर कंपनी ‘Pure EV EcoDryft’ ही इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. ही एक कम्युटर इलेक्ट्रिक बाईक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १३५ किमीची राइडिंग रेंज देईल आणि या रेंजसोबत ७५ किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देखील मिळतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर त्यात ३ kWh चा बॅटरी पॅक उपलब्ध असेल.
(हे ही वाचा : आता घाबरायचं नाही! बॅटरी संपल्यावरही तुम्ही मुक्कामापर्यंत पोहोचणार, ‘या’ खास E-Cycle बद्दल माहितेय का? )
या बाईकमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच स्पोक अलॉय व्हील, सिंगल पीस सीट, आकर्षक डिझाईनची इंधन टाकी, ज्यामध्ये स्टोरेज उपलब्ध आहे. कलर्सबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आकर्षक किंमतीत कम्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाईल. EcoDryft लाल, काळा, राखाडी आणि निळा या चार रंगांच्या पर्यायांमध्ये विकला जाईल.
कधी होणार लाँच?
या नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात समोर येईल असे सांगितले जात आहे. कंपनी ही बाईक जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. PURE EV EcoDryft या इलेक्ट्रिक बाईकची स्पर्धा Revolt RV400, Tork Kratos आणि Oben Rorr सोबत होईल.