मारुती सुझुकी एर्टिगाने देशातील सर्वाधिक विक्री होणारी MPV म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की, एर्टिगा सर्वांनाच आवडेल. ही कार न आवडणारे बरेच लोकही असू शकतात. ज्यांना एर्टिगा आवडत नाही त्यांच्यासाठी बाजारात कोणते पर्याय आहेत माहितेय का? याचे उत्तर असू शकते किआ केरेन्स. Kia Carens ची विक्री देखील चांगली आहे. फीचर्सच्या बाबतीत ते मारुती एर्टिगा पेक्षाही पुढे आहे. तथापि, किंमत टॅग देखील Ertiga पेक्षा जास्त आहे. चला, कॅरेन्सची किंमत, वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलूया.

जबरदस्त लूकसह येते Kia Carens

Kia Carens मध्ये १६ इंच एलॉय व्हील्स, मध्यभागी पातळ लाइट स्ट्रिपसह रॅपराउंड एलईडी टेललॅम्प आणि ORVM वर इंटिग्रेटेड टर्न सिग्नल देण्यात आला आहे. याशिवाय नवीन बोनट स्ट्रक्चर, इंटीग्रेटेड LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRL), बंपरच्या खाली दिलेले सेंट्रल एअर इनटेक कारला खास बनवतात. कारचा व्हीलबेस २७८०mm, लांबी ४५४०mm, रुंदी १८००mm आणि १७००mm आहे ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला ३ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये ६-एअरबॅग, पार्किंग कॅमेरा आणि सेंसर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स मिळतील.

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
panvel toll collector killed by speeding truck in Roadpali on Saturday
भरधाव ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार 

(हे ही वाचा: Fortuner चा गेम होणार? देशात दाखल होतेय सर्वात स्वस्त SUV कार, फीचर्स पाहून उडतील होश)

Kia Carens मध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये, ग्राहक १६०PS/२५३Nm जनरेट करणारे १.५L टर्बो पेट्रोल इंजिन, ११५PS/२४२Nm जनरेट करणारे १.५L पेट्रोल इंजिन आणि ११६PS/२५०Nm जनरेट करणारे १.५L टर्बो डिझेल इंजिन यापैकी पर्याय निवडू शकतात. MPV तीन ड्राइव्ह मोड्ससह येतो. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट. हे ६iMT आणि ७-स्पीड DCT ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते. हे ६ सीटर आणि ७ सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येते.

Kia Carens ची किंमत

Kia Carens ची किंमत १०.४५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १८.९५ लाख रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच केर्न्स एर्टिगाच्या तुलनेत खूपच महाग आहे.