गेल्या काही वर्षांत कारचं मार्केट वेगानं विस्तारत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या, नावीन्यपूर्ण फीचर्स असलेल्या कार, एसयूव्ही उपलब्ध आहेत. इंधनाचे दर सातत्यानं वाढत असल्याने अनेक जण इलेक्ट्रिक कार (Electric Car) खरेदीकडे वळत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जवळपास सर्वच कार कंपन्या इलेक्ट्रिक कारची नवनवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्कोडा कंपनी (Skoda Company) भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार लॉंच करणार आहे. Skoda Enyaq iV ही इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे.
ही कार (Skoda Enyaq iV) नुकतीच पुण्याजवळील एका चार्जिंग स्टेशनवर एसयूव्ही चालू असताना चाचणीदरम्यान दिसली. नवीन गुप्तचर फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत. यात दिसते की, Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक SUV काळ्या रंगाच्या शेडमध्ये पूर्ण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेक ऑटोमेकरने चाचणीच्या उद्देशाने SUV भारतात आयात केली आहे. ही २०२३च्या उत्तरार्धात भारतात लाँच करण्याची योजना आहे.
(हे ही वाचा : बुलेट खरेदी करणे परवडत नाही, मग तुमच्या बजेटमधील ‘या’ ५ जबरदस्त फीचर्सवाल्या बाईक पाहा )
सर्वाधिक रेंज असणारी देशातील पहिली कार
भारतात स्कोडा टॉप-स्पेक Enyaq iV 80X लाँच करू शकते, जी ७७ kWh बॅटरी पॅकसह येते आणि १२५kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ही कार ड्युअल मोटरसह येते. यात प्रत्येक एक्सलवर एक AWD (ऑल-व्हील-ड्राईव्ह) सेटअप आणि एकूण २६५ bhp ची पावर मिळते. या इलेक्ट्रिक एसयूव्ही बद्दल कंपनीचा दावा आहे की ही फक्त ६.९ सेकंदात ०-१०० ताशी वेग गाठू शकते. हा मॉडेल ५१३ किमी पर्यंतच्या WLTP रेटेड रेंजसह येतो, ज्यामुळे ही कार या सेगमेंटमधील सर्वात जास्त रेंज देणारी ईव्ही बनू शकते.
Skoda Enyaq iV चे फीचर्स
Skoda Enyaq iV इलेक्ट्रिक एसयूव्ही १९-इंच प्रोटियस अलॉय व्हील्स, १३-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, अॅम्बिएंट लाइटिंग, लेदर-रॅपिड स्टीयरिंग व्हील आणि अपहोल्स्ट्रीसह बाजारात येईल. ज्यात लेदर आणि मायक्रोफायबर फॅब्रिकचं मिश्रण आहे. स्कोडा इलेक्ट्रिक एसयूव्ही कमी किंमतीत सादर करण्यासाठी कंपनी लो-स्पेक, टू-व्हील ड्राईव्ह मॉडेल देखील सादर करू शकते. स्कोडा Enyaq iV वोक्सवॅगन समूहच्या MEB born electric platform वर आधारित आहे. प्लॅटफॉर्म सिंगल-मोटर, RWD आणि ड्युअल-मोटर AWD सेटअपसह कॉम्पिटेबल आहे, दोन्ही Enyaq iV सह उपलब्ध आहेत.