Top Selling Car- Maruti Suzuki:  मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. जर आपण त्याच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेल्सबद्दल बोललो, तर बहुतेक लोकांच्या मनात अल्टो, वॅगनआर किंवा बलेनो सारख्या मॉडेल्सची नावे येतील. पण, मार्च २०२३ मध्ये काही वेगळेच घडले. मार्च महिन्यात अल्टो, वॅगनआर आणि बलेनोला मागे टाकत मारुती स्विफ्टने त्यापैकी सर्वाधिक विक्री केली आहे. या कारची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुती स्विफ्टने बाजी मारली

मारुती स्विफ्ट ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. वार्षिक आधारावर मारुती स्विफ्टच्या विक्रीत सुमारे २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२२ मध्ये, मारुती स्विफ्टच्या एकूण १३,६३२ युनिट्सची विक्री झाली होती परंतु गेल्या महिन्यात (मार्च २०२३) १७,५९९ युनिट्सची विक्री झाली. या विक्रीच्या आकड्यासह, मार्च २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत ते अव्वल स्थानावर आहे.

वॅगनआर दुसऱ्या स्थानावर

मारुती स्विफ्टनंतर मारुती सुझुकी वॅगनआर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तथापि, वॅगनआरच्या विक्रीत वर्षानुवर्षे सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु, असे असूनही, वॅगनआरने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी मार्च २०२२ मध्ये, मारुती सुझुकी वॅगनआरच्या २४,६३४ युनिट्सची विक्री झाली होती, त्या तुलनेत यावर्षी मार्चमध्ये केवळ १७,३०५ युनिट्सची विक्री झाली.

(हे ही वाचा : आली रे आली! देशात नवी Lamborghini कार दाखल, स्पीड पाहून व्हाल थक्क, किंमत… )

ब्रेझा तिसऱ्या आणि बलेनो चौथ्या क्रमांकावर

त्याचवेळी विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर आहे. वार्षिक आधारावर, त्याची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आणि यासह ती १६,२२७ युनिट्सवर पोहोचली, तर मार्च २०२२ मध्ये केवळ १२,४३९ युनिट्सची विक्री झाली. बरं, येथे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की मार्च २०२३ मध्ये, Brezza देखील सर्वाधिक विक्री होणारी SUV ठरली आहे.

बलेनो ही अनेक वेळा (वेगवेगळ्या महिन्यांत) सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे परंतु मार्च महिना तिच्यासाठी चांगला राहिला नाही. जरी त्याची विक्री वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढली असली तरी विक्रीच्या बाबतीत ती चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. मार्च २०२३ मध्ये १६,१६८ युनिट्सची विक्री झाली आहे तर मार्च २०२२ मध्ये १४,५२० युनिट्सची विक्री झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The swift is arguably one of the most successful maruti suzuki products that has attracted buyers from all age groups in march 2023 the swift sold 17559 units pdb
Show comments