Tata Defence Car:  महिंद्रा थार (Mahindra Thar) आणि मारुती जिमनी (Maruti Jimny) हे दोन्ही त्यांच्या उत्कृष्ट ऑफरोडिंग क्षमतेमुळे भारतात लोकप्रिय होत आहेत. जेथे महिंद्रा थार एसयूव्हीचा प्रतीक्षा कालावधी १.५ वर्षांपर्यंत पोहोचला आहे. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केलेल्या मारुती जिमनीलाही आतापर्यंत २३ हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. तथापि, अनेकांना माहीत नाही की, टाटा मोटर्स एक शक्तिशाली 4X4 SUV देखील विकते. विशेष म्हणजे, यामध्ये जास्तीत जास्त ९ प्रवासी बसू शकतात. चला जाणून घेऊया या कारची माहिती…

टाटा मोटर्स केवळ प्रवासी वाहनेच बनवत नाही तर व्यावसायिक वाहने देखील बनवते. याशिवाय कंपनी संरक्षणासाठी काही वाहनेही बनवते. यामध्ये काही वाहने संरक्षणासाठीही बनवली जातात. यामध्ये आर्मर्ड व्हेईकल, पिकअप ट्रक, लॉजिस्टिक मिलिटरी व्हेईकल, माइन प्रोटेक्टेड व्हेईकल, कॉम्बॅट व्हेईकल यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, टाटा मोटर्सला केवळ भारतीय लष्कराकडूनच नव्हे तर परदेशातूनही यासाठी ऑर्डर मिळतात. असेच एक वाहन ‘Xenon DC 4X4’ आहे जे संरक्षणासाठी सैन्य वाहक म्हणून काम करते.

jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Loksatta vyaktivedh Indu Chandhok Passes Away The Culture of Car Racing in India Car Racing Formula One
व्यक्तिवेध: इंदु चंधोक
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास
Maruti Suzuki to increase car prices from Jan 2024
नवीन वर्षात वाहने महागणार! मारुती सुझुकीसह बहुताशांकडून किंमतीत वाढ
tata motors launches re wi re vehicle scrapping facility in pune
टाटांची पुण्यात अभिनव ‘रिवायर’ सुविधा; वर्षाला २१ हजार जुनी वाहने भंगारात काढण्याची क्षमता
skoda Kylaq suv launched know its price and varients google trends
Skoda Kylaq SUV: स्कोडाने केली सगळ्यांची बोलती बंद! सर्वात स्वस्त एसयूव्ही झाली लाँच, किंमत फक्त…

(हे ही वाचा : मारुती, महिंद्रा नव्हे तर ‘ही’ कार आहे देशातील सर्वात सुरक्षित कार, तुम्ही आणि तुमचं कुटुंब राहणार एकदम सेफ )

Xenon DC 4X4 हार्ड टॉप आणि सॉफ्ट टॉप दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि जास्तीत जास्त ९ प्रवासी बसू शकतात. यात मागील बाजूस ४ लोक बसू शकतात, तर पहिल्या रांगेत दोन आणि दुसऱ्या रांगेत तीन बसू शकतात. ही कार २९५६ सीसी ४-सिलेंडर डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे जी ११२hp पॉवर आणि ३००NM टॉर्क जनरेट करते. यात ४X४ क्षमता देखील आहेत ज्यामुळे ते अवघड भूप्रदेशातून सहजतेने नेव्हिगेट करू शकतात. याव्यतिरिक्त, कारला पॉवर स्टीयरिंग आणि ३१५० मिमीचा व्हीलबेस मिळतो. तथापि, Xenon DC 4X4 फक्त संरक्षण उद्देशांसाठी ऑर्डरवर उपलब्ध आहे.

Story img Loader