टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (Toyota Kirloskar Motor) त्यांची लाईफस्टाईल युटीलिटी व्हेईकल ‘द हायलक्स’ (Toyota Hilux) गेल्या वर्षी लाँच केली आहे. ही कार फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार असल्याचे बोलले जाते. चांगला परफॉर्मन्स, अधिक कार्यक्षमता, पॉवर आणि अत्याधुनिकतेसह तुम्हाला यात शहरातील ड्राईव्हसाठी सर्वोत्तम सुखसोयी, अद्वितीय शक्ती, सु-संतुलित युटीलिटी आणि साहसाचा अनुभव मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मार्च २०२२ मध्ये लाँच करताना एंट्री-लेव्हल Hilux ची किंमत ३३.९९ लाख रुपये होती, परंतु एक वर्षानंतर, Toyota ने Hilux पुन्हा ३०.४० लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत, ३.५९ लाख रुपयांची कपात केली. किमतीत कपात फक्त एंट्री-लेव्हल Hilux स्टँडर्ड 4WD MT साठी करण्यात आली आहे, तर टॉप-स्पेक हाय ट्रिमच्या किमती मॅन्युअलसाठी १.३५ लाख आणि ऑटोमॅटिकसाठी १.१० लाख वाढवण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांची किंमत अनुक्रमे ३७.१५ लाख आणि ३७.९० रुपये झाली आहे. काही डीलर्सशी बोलल्यानंतर असे दिसून आले की हायलक्सवर किमान ६ लाख रुपयांची सूट दिली जात आहे. परंतु काही आऊटलेट्स इन्व्हेंटरीवर अवलंबून उच्च व्हेरियंटवर ८ लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत.

(हे ही वाचा : सर्व कंपन्यांचे उडाले होश, फक्त ३ सेकंदात १००kmph चा वेग, BMW ची बाईक देशात दाखल, बुकिंगही सुरू, किंमत… )

Toyota Hilux वैशिष्ट्ये

हायलक्स मध्ये ७०० मिमि पाण्यातून वाट काढण्याची (वॉटर वेडिंग) अद्वितीय क्षमता आहे. नवीन आठ-इंची स्मार्ट प्लेकास्ट टचस्क्रीन ऑडियो, सर्वोत्तम दर्जाची लेदर सीट्स, इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटणसह स्मार्ट एन्ट्री आदी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. 

टोयोटा हायलक्स ट्रकमध्ये २.८ लिटरचे फोर-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिन ६-स्पीड ऑटोमॅटिक आणि ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या सेग्मेंट मधील सर्वोत्तम २०४ HP पॉवर आणि ५०० Nm चे टॉर्क आउटपुट अॅटोमध्ये मिळते. तर मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) प्रकारात २०४ HP पॉवर आणि ४२० Nm चे टॉर्क आउटपुट मिळते. सर्व प्रकारांमध्ये (व्हेरीयंट) ग्राहकांना अत्यंत सहज ऑफ-रोडिंग साठी ४x४ ड्राईव्हट्रेन उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The toyota hilux is currently available with a discount of up to rs 8 lakh across india pdb
Show comments