Maruti Suzuki Expensive MPV: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत सात सीटर MPV कार विकते. मारुती एर्टिगा आणि मारुती XL6. कंपनीने गेल्या वर्षी टोयोटासोबत भागीदारी करून मारुती ग्रँड विटारा एसयूव्ही आणली होती. कंपनी MPV आणि SUV कारवर लक्ष केंद्रित करत आहे आणि सतत आपला पोर्टफोलिओ अपडेट करत आहे. मारुती या वर्षी आपली सर्वात महागडी कार भारतात लाँच करणार आहे. ही सात-सीटर एमपीव्ही असू शकते. नवीन MPV मारुतीच्या लाइनअपमध्ये XL6 च्या वर असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिझाइन कसे असेल?

टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसवर आधारित, नवीन एमपीव्हीची रचना थोडी वेगळी असेल. ADAS तंत्रज्ञान असलेली ही मारुती सुझुकीची पहिली कार असेल. या प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणालीमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असेल. यामध्ये ६ एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम यासारखी मानक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील मिळतील.

(हे ही वाचा : Tata Punch चा खेळ संपला? या महिन्यात मारुती आणतेय देशातील सर्वात स्वस्त SUV, किंमत फक्त…)

इंजिन आणि पॉवर

नवीन मारुती MPV मध्ये दोन सीटिंग कॉन्फिगरेशन असतील सात आणि आठ सीटर. हे त्याच २.०L, ४-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल हायब्रिड (१८४bhp, ई-ड्राइव्ह ट्रान्समिशन) आणि २.०L पेट्रोल युनिट (१७२bhp/२०५Nm, एक CVT गिअरबॉक्स) सह येईल जे इनोव्हा हायक्रॉसला शक्ती देते. MPV चे स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञान २३.२४ किमी प्रति लीटर पेक्षा जास्त मायलेज देईल. ही कार २०२३ च्या सणासुदीच्या काळात लाँच होण्याची शक्यता आहे.

किंमत किती असेल?

मारुती XL6 ची किंमत ११.४१ लाख ते १४.६७ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. त्याचवेळी, नवीन MPV ची किंमत २० लाख ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे आणि ती Nexa डीलरशिपद्वारे विकली जाईल.