Hyundai आणि Kia ने मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटवर मजबूत पकड राखली आहे. त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्स क्रेटा अन् सेल्टोसची चांगली विक्री होत आहे. आता या दोघांनाही लवकरच अपग्रेड मिळणार आहे. Kia India ने आधीच फेसलिफ्टेड सेल्टोसचे अनावरण केले आहे आणि प्री-बुकिंग देखील सुरू केले आहे. मात्र, येत्या आठवड्याभरात किमती जाहीर केल्या जातील. Hyundai Creta च्या अद्यतनित आवृत्तीची चाचणी देखील सुरू आहे. तथापि, ते २०२४ च्या सुरुवातीला लाँच केले जाऊ शकते.
Kia Seltos Facelift 2023
नवीन सेल्टोसला बुकिंगच्या पहिल्याच दिवशी १३,४२४ ऑर्डर मिळाल्या आहेत. Kia Seltos चे फेसलिफ्ट मॉडेल GT Line, Tech Line आणि X Line या तीन प्रकारांसह बाजारात सादर करण्यात आले आहे. गाडीच्या इंटीरियरवर विशेष लक्ष देत कंपनीने ड्युअल १०.२५ इंच डिस्प्ले दिला आहे. याशिवाय व्हॉईस कंट्रोल पॅनोरमिक सनरूफ देण्यात आला आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १५८ hp पॉवर आणि २५३ Nm टॉर्क जनरेट करू शकते.
(हे ही वाचा : Creta च वाढलयं टेन्शन, देशभरात पेट्रोलवर २८ Kmpl मायलेज देणाऱ्या मारुती कारचा जलवा; होतेय धडाधड विक्री )
यामध्ये ADAS, ३६०-डिग्री कॅमेरा, १८-इंच अलॉय व्हील, सहा एअरबॅग, ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल स्टार्ट असिस्ट, वाहन स्थिरता व्यवस्थापन, मागील पार्किंग सेन्सर्स, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि स्पीड सेन्सिंग ऑटो यांचा समावेश आहे. दरवाजे लॉक सारखी वैशिष्ट्ये असतील.
Hyundai Creta Facelift 2024
२०२४ Hyundai Creta फेसलिफ्टची चाचणी आधीच सुरू झाली आहे. यात ADAS आणि ३६०-डिग्री कॅमेरा आणि Kia Seltos प्रमाणेच अनेक अपडेटेड फीचर्स मिळतील. डिझाइन आणि स्टाइलमध्येही बदल होतील. यात क्यूब सारखी डिटेलिंग आणि एलईडी डीआरएलसह पॅलिसेड-प्रेरित ग्रिल मिळू शकते. समोर, नवीन पिढीच्या Verna मधून घेतलेली पूर्ण-विस्तृत LED लाइट बार असेल. याशिवाय, मागील बाजूस सुधारित टेलगेट, एलईडी लाइट बारद्वारे कनेक्ट केलेले नवीन एलईडी टेललॅम्प आणि सुधारित बंपर मिळतील. २०२४ Hyundai Creta तीन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल – १.५L पेट्रोल (११५bhp), १.५L टर्बो पेट्रोल (१६०bhp) आणि १.५L डिझेल (११५bhp) मिळेल.