जेव्हा आपण रस्त्यावर चालत असतो, तेव्हा आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये ट्रॅफिक, हॉर्नचा त्रासदायक आवाज इत्यादी समस्या आहेत. त्रासदायक आवाज असूनही हॉर्न हे वाहनांसाठी अत्यावश्यक साधन मानले जाते. अशावेळी यातून सुटका करून घेण्यासाठी, हवेत प्रवास केला असता तर या हॉर्नच्या आवाजापासून वाचता आले असते, असा विचार लोक करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र विमानाचा प्रवास आवाजाशिवाय होतो का? उत्तर नाही आहे. विमान प्रवासातही अनेक अडचणी येतात. त्यामुळे विमानालाही हॉर्न असतात. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वास्तविक, विमानात दिलेला हॉर्न ग्राउंड इंजिनीअर आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि कोणत्याही धोक्याची सूचना देण्यासाठी वापरला जातो. उड्डाण करण्यापूर्वी विमानात काही बिघाड झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विमानात बसलेला पायलट किंवा अभियंता हा हॉर्न वाजवून ग्राउंड इंजिनीअरला अलर्ट मेसेज पाठवतो.

‘या’ टिप्सचा वापर करून टायर पंक्चरच्या समस्येपासून मिळेल सुटका; चाकांचे आयुष्यही वाढणार

या हॉर्नचे बटण विमानाच्या कॉकपिटवर असते. हे कॉकपिट कंट्रोल्समधील इतर बटणांसारखेच आहे, ज्यामुळे ते शोधणे कठीण आहे. या बटणाच्या वर ‘जीएनडी’ (ग्राउंड) लिहिलेले आहे. हे बटण दाबल्यावर विमानातील अलर्ट सिस्टम सुरू होते आणि सायरनसारखा आवाज येतो. विमानातील हॉर्न लँडिंग गीअर कंपार्टमेंटमध्ये बसवले जाते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की विमानांमध्ये स्वयंचलित हॉर्न देखील असतात जे सिस्टममध्ये बिघाड किंवा आग लागल्याने आपोआप आवाज करतात. विशेष म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो, जो वेगवेगळ्या सिस्टीममधील दोषानुसार वेगवेगळ्या आवाजात वाजतो. यामुळे विमान अभियंत्यांना जहाजाच्या कोणत्या भागामध्ये बिघाड झाला आहे हे शोधता येते. विमानात असताना वैमानिक हॉर्न वाजवू शकत नाही कारण त्यावेळी जहाजाची चेतावणी यंत्रणा बंद असते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are also horns on the plane find out exactly when and why these horns are used pvp