17 Cars & SUVs Will Be Discontinued From April 1, 2023: काही तासातच नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल आणि नवीन आर्थिक वर्षात अनेक मोठे बदल होतील. या बदलामध्ये ऑटो क्षेत्राचाही समावेश आहे. तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण १ एप्रिलपासून काही कंपन्यांच्या १७ कार मॉडेल्सचे उत्पादन बंद होईल आणि ते बाजारात दिसणार नाहीत. मारुती, होंडा, ह्युंदाई आणि महिंद्रासह अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे अनेक कार मॉडेल १ एप्रिलनंतर येणे बंद होणार आहेत. या १७ कारमध्ये होंडाच्या ५, महिंद्राच्या ३, ह्युंदाई आणि स्कोडाच्या २-२, रेनॉल्ट, निशान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा यांच्या १-१ कारचा समावेश आहे.

‘या’ १७ कार बंद होण्याचे कारण काय?

१ एप्रिल २०२३ पासून भारतीय वाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) चे नवीन उत्सर्जन नियम लागू केले जात आहेत. १ एप्रिलपासून विद्यमान बीएस-६ उत्सर्जन मानदंडांचा दुसरा टप्पा लागू केला जात आहे. आता या नियमाचे पालन करणारी वाहनेच विकली जातील पण जी वाहने त्याची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना १ एप्रिलनंतर भारतीय बाजारपेठेत आपली वाहने विकता येणार नाहीत.

IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या योग्य चॅनेल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
sugar Factories, sugar commissionerate, sugar,
आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत

(हे ही वाचा: खरंच कार आणि बाईकचे मायलेज वाढवणारे कोणतेही उपकरण आहे का? जाणून घ्या यामागील सत्य )

नवीन नियमामुळे कारच्या किमती वाढत आहेत

नवीन उत्सर्जन नियमांमुळे कारची किंमत कंपनीला महाग होत असून, त्यानंतर कंपन्या कारच्या किमती वाढवत असून त्याचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडत आहे. सध्याच्या मॉडेलची इंजिने अपडेट करावी लागतील, त्यामुळे खर्च वाढत आहे. २०२० मध्ये बीएस-६ स्टँडर्ड इंजिन सादर करण्यात आले होते, ज्यामुळे कारच्या किमती ५०-९० हजार रुपयांनी वाढल्या होत्या आणि दुचाकींच्या किमती ३-१० हजार रुपयांनी वाढल्या होत्या.

‘या’ कार होणार बंद

  • Honda: City 4th Gen, Amaze Diesel, City 5th Gen Diesel, Jazz, – WR-V
  • Hyundai: i20 Diesel, Verna Diesel
  • Tata: Altroz Diesel
  • Mahindra: Marazzo, Alturas G4, KUV100
  • Renault: Kwid 800
  • Skoda: Octavia and Superb
  • Nissan: Kicks Toyota: Innova Crystal Petrol Maruti Suzuki: Alto 800