Longest Driving Range Electric Scooters: इंधनांचे वाढते दर, प्रदूषणामुळे अनेकांचा इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) खरेदीकडे कल वाढत आहे. ग्राहकांची मागणी बघता अनेक कंपन्यांनी इलेक्टिक स्कूटर्स आणि इलेक्ट्रिक कार बाजारात लाँच केल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी सरकारदेखील प्रोत्साहन देत आहे. देशात सर्वात लांब ड्रायव्हिंग रेंज इलेक्ट्रिक वाहन विभागात स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त आणि मस्त रेंज देणाऱ्या स्कूटरविषयी माहिती देणार आहोत.
‘या’ आहेत देशातल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर
iVOOMi S1 240
iVOOMi S1 240 ही स्कूटर कमी पैशात चांगला रेंज देणारी आहे. यात ४.२ Kwh ट्विन रिमूव्हेबल बॅटरी सेटअप आहे. ते एका चार्जमध्ये २४० किमी पर्यंत प्रवास करू शकते. ही स्कूटर तीन वर्षांच्या बॅटरी गॅरंटीसह येत आहे. या मालिकेतील स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ६९,९९९ रुपये आहे.
(हे ही वाचा : सिंगल चार्जमध्ये ५०० किलोमीटरहून अधिक धावणार ‘ही’ इलेक्ट्रिक कार; अन् लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात )
Vida V1
Vida V1 स्कूटर एका चार्जवर १६५ किमीच्या रेंजचा दावा करते. या इलेक्ट्रिक स्कूटरला ०-८० टक्के पर्यंत चार्ज करण्यासाठी सुमारे सहा तास लागतात. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ८० किमी प्रतितास आहे आणि तीन वर्ष या स्कूटरच्या बॅटरीचे आयुष्य आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.४५ लाख रुपये आहे.
Ola S1 Pro
Ola S1 Pro स्कूटरमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. यामध्ये वापरलेली ८.५ kW ची मोटर याला ११५ kmph चा टॉप स्पीड देते. Ola S1 मध्ये ४ kWh बॅटरी वापरण्यात आली आहे. ARAI-प्रमाणित नुसार, ही स्कूटर एका चार्जवर १८१ किमी अंतर कापू शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १,३९,९९९ रुपयांपासून सुरू होते.
(हे ही वाचा : बुलेट खरेदी करणे परवडत नाही, मग तुमच्या बजेटमधील ‘या’ ५ जबरदस्त फीचर्सवाल्या बाईक पाहा )
Okinawa Okhi 9
Okinawa Okhi 90 ही स्कूटर एका चार्जमध्ये १६० किलोमीटर अंतर कापू शकते. ही स्कूटर चार्ज होण्यासाठी ५-६ तास लागतात. वाहनात २५०० W, BLDC मोटर मिड-ड्राइव्ह आहे. ते ८०-९० किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देते. त्याची एक्स-शो रूम किंमत १,८६,००० आहे.
Okaya Fast F4
Okaya Fast F4 या स्कूटरमध्ये लिथियम फॉस्फेट बॅटरी देण्यात आली आहे. जे नवीन ई-स्कूटरला ४.४ kW ची शक्ती देते. ते तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते. स्कूटर एका चार्जवर १५० किमी अंतर कापू शकते. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी ५ ते ६ तास लागतात. त्याची एक्स-शोरूम किंमत १०९,००० रुपये आहे.