Top 3 Cheapest CNG Cars: इंधनाचे दर वाढल्यामुळे अनेक ग्राहक सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहेत. मागणी वाढल्याने वाहन उत्पादक कंपन्या देखील नवनवीन सीएनजी कार लाँच करू लागल्या आहेत. काही वर्षांपूर्वी पर्यंत भारतात मोजक्याच सीएनजी गाड्या उपलब्ध होत्या. परंतु आता या सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक दमदार पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही देखील एखादी सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सीएनजी कारच्या सध्याच्या रेंजमध्ये, टॉप 3 स्वस्त सीएनजी कारबद्दल सांगत आहोत ज्या कमी बजेटमध्ये सर्वाधिक मायलेजसाठी प्राधान्य देतात. चला तर मग जाणून घेऊया दमदार मायलेज देणाऱ्या सीएनजी कारची माहिती.
१. Maruti S-Presso CNG
देशातल्या सर्वात स्वस्त सीएनजी कारच्या यादीत मारुती एस प्रेसोचा नाव येतो. कंपनीने हे सीएनजी मॉडेल अलिकडेच लाँच केलं आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ५.९० लाख रुपये इतकी आहे. यामध्ये ९९८ सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. ही कार सीएनजीवर ३२.७३ किमी प्रति किलो इतकं मायलेज देते. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. ही कार तिच्या लूक्समुळे देशात खूप लोकप्रिय आहे. ही एक मायक्रो एसयूव्ही आहे.
(आणखी वाचा : Car and Bike Mileage: आता व्हा टेन्शन फ्री! तुमच्या कार आणि बाईकचं मायलेज वाढणार, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स)
२. Maruti Alto 800 S-CNG
मारुती अल्टो 800 भारतीय बाजारपेठेत लोकांच्या मनावर राज्य करते. अशा परिस्थितीत, मारुती अल्टो 800 हॅचबॅक ही या विभागातील सर्वात कमी किंमतीची कार आहे. Maruti Alto 800 CNG व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ५,०३,००० लाख रुपये आहे.
मारुती अल्टोमध्ये दिलेले ०.८-लिटर तीन-सिलेंडर इंजिन दोन CNG वर ४० PS पॉवर आणि ६० Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही कार CNG वर ३१.५९ kmpl चा मायलेज देते ज्याला ARAI ने प्रमाणित केले आहे.
३. Maruti Alto K10 CNG
कंपनीने नुकतीच मारुती अल्टो K10 CNG बाजारात आणली आहे. या कारचे चार प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यापैकी फक्त एका व्हेरियंटमध्ये CNG किटचा पर्याय आहे. मारुती अल्टो K10 CNG ची किंमत ५,९४,५०० रुपये एक्स-शोरूम (दिल्ली) आहे आणि ऑन-रोड ६,४७,०१४ रुपये आहे.