देशातील वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे, ज्यात सर्व कार निर्माते आणि दुचाकी निर्माते यांचा समावेश आहे. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला २०२१ मध्ये बनवलेल्या टॉप ३ कारची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या देशातील सर्वाधिक विक्री होणऱ्या कार आहेत.
या टॉप ३ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या तपशीलांमध्ये, या तिन्ही करच्या किमती, फीचर्स , मायलेज आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित प्रत्येक तपशील सांगणार आहोत.
मारुती वॅगनआर (Maruti WagonR)
ही त्यांच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे जी २०२१ ची सर्वाधिक विक्री होणारी कार देखील बनली आहे. कंपनीने २०२१ मध्ये या मारुती वॅगनआरच्या १,८३,८५१ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामुळे ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आली आहे.
(हे ही वाचा: Hero Pleasure Plus vs Honda Activa 6G: किंमत, मायलेज आणि स्टाइलमध्ये कोणता आहे सर्वोत्तम पर्याय? जाणून घ्या)
मारुती वॅगनआरमध्ये, कंपनीने ११९७ सीसीचे इंजिन दिले आहे जे १ लीटर पेट्रोल इंजिन आहे आणि हे इंजिन ६८ पी एस ची पॉवर आणि ९० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.
याशिवाय मॅन्युअल एसी, पॉवर विंडो, कीलेस एंट्री आणि स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि कॉलिंग कंट्रोल सारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. मारुती वॅगनआर कारची सुरुवातीची किंमत ४.९३ लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये गेल्यावर ६.४५ लाखांपर्यंत जाते.
मारुती स्विफ्ट (Maruti Swift)
ही स्पोर्टी डिझाईन असलेली प्रिमियम हॅचबॅक आहे जी देशात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झाली आहे. कंपनीने २०२१ मध्ये या मारुती स्विफ्टच्या १,७५,०५२ युनिट्सची विक्री केली आहे, त्यानंतर ती देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(हे ही वाचा: ‘ही’ आहे भारतातील स्वस्त ७ सीटर फॅमिली कार; किंमत ८ लाखांपर्यंत)
कारमध्ये ११९७ सीसी १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन आहे जे ९० पीएस पॉवर आणि ११३ एन एम पीक टॉर्क जनरेट करते.कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ४.२ इंचाचा रंगीत ड्रायव्हर डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. मारुती स्विफ्टची सुरुवातीची किंमत ५.८५ लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटवर जाते तेव्हा ती ८.६७ लाख रुपयांपर्यंत जाते.
मारुती बलेनो (Maruti Baleno)
ही तिच्या कंपनीची प्रीमियम हॅचबॅक आहे, जी आता कंपनीच्या तसेच देशाच्या सर्वोत्तम विक्री करांच्या गणनेत आली आहे. कंपनीने २०२१ मध्ये या मारुती बलेनोच्या १,७१,२४१ युनिट्सची विक्री केली आहे, ज्यामुळे ही कार देशातील तिसरी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे.
(हे ही वाचा: Hero Pleasure Plus vs Honda Dio: मायलेज, स्टाईल आणि किमतीत कोण आहे बेस्ट? जाणून घ्या)
मारुती बलेनोमध्ये ११९७ सीसी १.२ लिटर पेट्रोल इंजिन आहे जे ८३ पीएस पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे तर, Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुश बटण स्टार्ट-स्टॉप आणि कीलेस एंट्री सारखी फीचर्स प्रदान करण्यात आली आहेत.
मारुती बलेनोची सुरुवातीची किंमत ५.९९ लाख रुपये आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटवर जाते तेव्हा ती ९.४५ लाखांपर्यंत जाते.