Top 10 Bikes : जुन २०२४ मध्ये भारतात दुचाकी विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २२.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून २०२३ मध्ये ६,७१, २५७ युनिट होते तर आता ८ ,२२,०४१ युनिट आहे. जून २०२४ मध्ये भारतात कोणत्या टॉप १० दुचाकींची सर्वात जास्त विक्री झाली, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
देशातील टॉप १० दुचाकी
हिरो स्प्लेंडर
हिरो स्प्लेंडर ही दुचारी सतत टॉपवर आहे. या दुचाकीची विक्री मागील महिन्यात ३,०५, ५८६ युनिट होती तर जून २०२३ च्या तुलनेत यामध्ये २८.२१ टक्क्यांची वाढ झाली आहे. या दुचाकीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकप्रियतेमुळे या दुचाकीची सर्वात जास्त विक्री झाली असून नंबर एक वर आहे.
हिरो शाइन
दमदार बाइक म्हणून ओळखली जाणारी शाइनच्या विक्रीमध्ये ४०.६४ टक्क्यांची वृद्धी दिसून येते. १,३९,५८७ युनिट विकण्यात आले.
बजाज पल्सर
आपल्या देशात पल्सर सीरिजच्या दुचाकी सर्वाधिक विकल्या जातात. बजाज पल्सर दुचाकी विक्रीमध्ये ३.६३ टक्के वाढ झाली आहे. या लिस्टमध्ये ही दुचाकी तिसऱ्या स्थानावर आहे ज्याची विक्की, १,११, १०१ युनिट झाली.
हिरो एचएफ डिलक्स
हिरो एचएफ डिलक्स ही अधिक मायलेज देणार्या दुचाकीपैकी एक आहे. हिरो एचएफ डिलक्सच्या विक्रीमध्ये ०.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ८९ ,९४१ युनिटची विक्री झाली आहे.
टीव्हीएस Apache
TVS ची दमदार Apache दुचाकीच्या विक्रीमध्ये ३२.१२ टक्के वाढ झाली आहे. जून २०२३ च्या तुलनेत ३७,१६२ युनिट आहे.
बजाज प्लॅटिना
जबरदस्त मायलेज देणारी बजाज प्लॅटिना अतिशय लोकप्रिय आहे. पण सध्या मार्केटमध्ये बजाज प्लॅटिना च्या विक्रीमध्ये ९.४४ टक्के घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेचा विचार केला तर सध्या ३३,१०१ युनिट विक्री झाली आहे.
टिव्हीएस रेडर
टिव्हीएस रेडर दुचाकीच्या विक्रीमध्ये १३ टक्के घट झाली आहे, जी पहिल्या वर्षाच्या तुलनेत २९,८५० युनिट आहे.
होंडा सीबी युनिकॉर्न १५०
होंडा युनिकॉर्न १५० दुचाकीने मागील महिन्यात २६,७५१ युनिटची विक्री केली आहे ज्यामुळे ती या लिस्टमध्ये आठव्या स्थानावर आहे.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ही महागड्या दुचाकींपैकी एक आहे. या वर्षी या दुचाकीच्या विक्रीमध्ये घट दिसून आली. मागील वर्षाच्या तुलनेत २४,८०३ युनिट आहे.
हिरो ग्लॅमर
हिरो ग्लॅमरच्या दुचाकी विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ११५.८८ टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील महिन्यात या दुचाकीची २४, १५९ युनिटची विक्री झाली