मार्च महिन्यात अनेक कंपन्यांनी आपली नवीन वाहनं लाँच केली आहेत.आता एप्रिल महिन्यातही नवीन गाड्या लाँच केल्या जाणार आहेत. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी एप्रिलमध्ये लाँच होणाऱ्या गाड्यांबाबत जाणून घ्या.

Tata Nexon EV 2022: टाटा मोटर्स ६ एप्रिल २०२२ रोजी नवीन कार लाँच करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय एसयूव्ही इव्हीचा नवीन अवतार सादर करू शकते. कंपनी या इलेक्ट्रिक एसयूव्हीला फिचर्स आणि बॅटरी पॅकसह अपडेट करू शकते. त्यानंतर या इलेक्ट्रिक कारच्या ड्रायव्हिंग रेंजमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्याची Tata Nexon EV पूर्ण चार्ज केल्यावर ३१२ किलोमीटरच्या ड्रायव्हिंग रेंजचा दावा करते पण एकदा बॅटरी पॅक अपडेट केल्यावर, कार ४०० किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. याशिवाय, या इलेक्ट्रिक कारचे फिचर्स अपडेट करताना कंपनी त्यात काही नवीन कार कनेक्टेड फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स देखील जोडू शकते. ज्याच्या मदतीने कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले जाऊ शकतात.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग

Mercedes EQS EV: भारतात इलेक्ट्रिक कारची वाढती मागणी पाहता, लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज भारतात नवीन इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मर्सिडीज EQS EV लाँच करणार आहे. ही गाडी कंपनी १९ एप्रिल रोजी लाँच करेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये लांब ड्रायव्हिंग रेंजशिवाय कारच्या तिसऱ्या रांगेत बसण्याची व्यवस्था देखील देऊ शकते.

१ एप्रिलपासून कार खरेदी करणं पडेल महागात, कोणत्या गाड्यांचे भाव वाढणार? जाणून घ्या

New Maruti Ertiga 2022: मारुती एर्टिगा ही कंपनीची MPV सेगमेंटमधली एक लोकप्रिय ७ सीटर कार आहे. ही गाडी कंपनी नवीन अपडेट्ससह बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या एमपीव्हीच्या फिचर्ससह इंजिन देखील अपडेट करणार आहे. कंपनी एप्रिल २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात ही नवीन मारुती एर्टिगा लाँच करू शकते.

New Maruti XL6 2022: मारुती XL6 ही एक प्रीमियम कार आहे. कंपनी आणखी नवीन वैशिष्ट्यांसह सादर करणार आहे. नवीन वैशिष्ट्यांपैकी फ्रंट बंपर आणि ग्रिल देखील नवीन कार कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह अपडेट केले जातील. कंपनीने या कारच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी एप्रिल २०२२ मध्ये लॉन्च करू शकते.