Bike cleaning Tips: अनेक जण बाईक विकत घेताना ती आवडीने घेतात. पण, तिला स्वच्छ ठेवण्याचा खूप कंटाळा करतात. त्यामुळे हळूहळू नवीन बाईकही लवकर खराब होते. तुमची बाईक योग्य प्रकारे स्वच्छ केल्याने ती अगदी नव्यासारखी दिसेल. तसेच ती जास्तीत जास्त वर्ष तुमची साथ देईल. पावसाळ्याच्या दिवसात बाईकची काळजी घ्यावी यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

क्लच साइड स्ट्रेनर स्वच्छ करा

स्ट्रेनर दर तिसऱ्या सर्विसला बदलावी लागते. जेव्हा तुम्ही तुमच्या बाईकची सर्व्हिसिंग करून घेण्यासाठी जाल, तेव्हा ती एकदा पेट्रेल किंवा ओल्या कापडाने स्वच्छ करा. मात्र, जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही जेव्हाही बाईक सर्व्हिसिंगसाठी घ्याल, तेव्हा मेकॅनिकला ती साफ करायला सांगू शकता.

बाईकच्या इंजिनवरील काळे तेल स्वच्छ कसे करावे

बाईकच्या इंजिनवरील काळे तेल साफ करण्यासाठी २०० मिली डिझेल घ्या आणि ब्रशच्या मदतीने मोटरसायकलच्या इंजिनवरील काळ्या तेलाचे डाग स्वच्छ करा. तुम्हाला हे बाईकच्या संपूर्ण इंजिनवर करावे लागेल आणि नंतर ते कोरड्या कापडाने पुसून टाका.

शॅम्पूने बाईक धुवा

सर्वप्रथम बाईक पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर त्यावर कापडाने शॅम्पू लावा आणि संपूर्ण बाईक एकदा स्क्रब करा. संपूर्ण बाईकवर शॅम्पू लावल्यानंतर पुन्हा एकदा बाइक पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवा.

हेही वाचा: ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज

साखळी स्वच्छ करा

साखळी स्वच्छ करण्यासाठी बाईक मेन स्टँडवर उभी करा आणि एका कापडावर जुने मोबिल ऑइल लावून बाईकचे मागील चाक थोडे फिरवून संपूर्ण साखळीला लावा. संपूर्ण साखळीला तेल लावले की, ते कोरड्या कपड्याने स्वच्छ करा आणि त्यावर ग्रीस लावा, जेणेकरून तुमची बाईक अगदी सुरळीत चालेल.