Car Suspension System: सस्पेंशन सिस्टीम हा कारचा एक महत्त्वाचा भाग असून तो कारचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यात मोठी भूमिका बजावतो. कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना धक्के बसू नये म्हणून सस्पेंशन सिस्टीम हे खड्डे, खराब रस्ते आणि इतर अडथळ्यांमुळे येणारे धक्के सहन करते. सस्पेंशन सिस्टीम व्यवस्थित काम करत नसल्यास, कार चालवणे कठीण होऊ शकते. तसेच प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सस्पेंशन सिस्टीमची काळजी घेणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सस्पेंशन सिस्टीमची व्यवस्थित काळजी न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे कार चालवताना त्रास होईल तसेच तो दुरुस्त करण्याचा खर्चही वाढू शकतो.

सस्पेंशन सिस्टीमची अशी घ्या काळजी (Car Suspension System)

जुने पार्ट्स बदला

सस्पेंशन सिस्टममध्ये स्प्रिंग्स, शॉक शोषक, स्ट्रट्स, कंट्रोल आर्म्स आणि बॉल जॉइंट्ससह अनेक पार्ट असतात. यापैकी कोणताही पार्ट खराब झाल्यास त्याचा परिणाम सस्पेंशन सिस्टमवर होईल, यामुळे कारचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे कुठलाही भाग खराब झाला तर तो लगेच बदला.

ओरिजनल पार्ट्स वापरा

सस्पेंशन सिस्टमचे पार्ट्स बदलताना ते नेहमी ओरिजनल आणि उच्च-गुणवत्तेचे असायला हवे. कार कंपनीने सांगितलेल्या पार्ट्चा वापर करावा. बाजारातून स्वस्तात मिळणारे पार्ट तुमचे पैसे वाचवतील, पण नंतर हे अनेक समस्या निर्माण करू शकतात.

काळजीपूर्वक कार चालवा

रस्त्यावरून जाताना कार नेहमी काळजीपूर्वक चालवा. रस्ता खराब असल्यास किंवा रस्त्यावर खड्डे असल्यास त्याकडे लक्ष द्या. अशा रस्त्यांवर जास्त वेगाने कार चालवल्याने प्रवासात त्रास होतो, तसेच धोकाही निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: घरच्या घरी बाईकची सर्व्हिसिंग करायची आहे? ‘या’ सोप्या टिप्स वाचवतील तुमचे पैसे

कार ओव्हरलोड करू नका

कारमध्ये जास्त वजन असल्यास, सस्पेंशन सिस्टमवर अनावश्यक दबाव येतो. ओव्हरलोडमुळे तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते.