देशात १ एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे महागणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर२०२१ मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. यानुसार १ एप्रिल २०२२ पासून देशभरातील १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे आठ पटीने महाग होईल, असे नमूद केले होते. सेंट्रल मोटर व्हेईकल नियमाला (२३ वी सुधारणा) नियम, २०२१ असे नाव देण्यात आले आहे. हा नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होईल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा नियम १५ वर्षे जुन्या वाहनांना लागू असेल. ज्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त शुल्क भरावे लागणार आहे.
परिवहन मंत्रालयाच्या नियमांनुसार, १५ वर्षे जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी ५००० रुपये द्यावे लागतील. यापूर्वी हे शुल्क ६०० रुपये होते. त्याचप्रमाणे जुन्या दुचाकीच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी १००० रुपये भरावे लागतील. यापूर्वी ही रक्कम ३०० रुपये होती. यासोबतच १५ वर्षे जुन्या बस किंवा ट्रकच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी १२,५०० रुपये द्यावे लागतील, जे आतापर्यंत १५०० रुपये होते. यासोबतच छोट्या प्रवासी मोटार वाहनाच्या नोंदणीसाठी १० हजार रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी हे शुल्क १३०० रुपये होते.
१५ वर्षे जुनन्या वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण | सध्याचे शुल्क | १ एप्रिल २०२२ पासून शुल्क |
कार | ५,००० | ६०० |
बाइक | १,००० | ३०० |
बस, ट्रक | १२,५०० | १,५०० |
छोटी प्रवासी वाहनं | १०,००० | १,३०० |
इम्पोर्टेड कार | ४०,००० | |
इम्मोर्टेड बाइक | १०,००० |
Flying Saucer: ऑटो क्षेत्रात आणखी एक क्रांती, ऑक्टोकॉप्टरचं यशस्वी उड्डाण
इम्पोर्टेड कार आणि बाइकच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी ४० हजार रुपये आणि १० हजार रुपये भरावे लागतील. याशिवाय, जर तुमच्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र कालबाह्य झाले असेल आणि तुम्ही त्याचे नूतनीकरण करण्यासाठी गेलात, तर दररोज ५० रुपये जोडून शुल्क भरावे लागेल.