CNG Car Kit : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे अशात लोक पैसे वाचवण्यासाठी कारमध्ये सीएनजची किट लावताना दिसत आहे. जर तुम्ही सुद्धा तुमच्या कारमध्ये सीएनजी किट लावत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टींची काळजी घेतली तर भविष्यात तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जाणून घेऊ या सविस्तर.. (Things we should know Before choosing a CNG Kit in Your Car)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारमध्ये सीएनजी किट कोणी लावावी?

जर तुम्ही जुन्या कारमध्ये सीएनजी किट लावायचा विचार करतअसाल तर त्यापूर्वी त्याची गरज का आहे, हे समजून घ्या. जर कोणी महिन्यातून एक हजार किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त किलोमीटर प्रवास करत असेल, तर त्याला त्याच्या कारमध्ये पेट्रोलपेक्षा सीएनजी किट लावणे, योग्य राहील. पण तुम्ही खूप कमी प्रवास करत असाल आणि सीएनजी किट लावत असाल तर तुमचा खर्च आणखी वाढेल.

हेही वाचा : Kawasaki Ninja 300: कावासाकी ३०० चं मेड-इन-इंडिया मॉडेल लाँच; जबरदस्त लूक आणि किंमत आहे कमी…

कार कंपनीकडून मिळणारी वॉरंटी संपणार

प्रत्येक कार कंपनीकडून वॉरंटी दिली जाते पण जर तुम्ही कारमध्ये मार्केटमधून सीएनजी किट लावत असाल तर यामुळे तुम्हाला कार कंपनीकडून मिळणारी वॉरंटी संपेल. त्यानंतर तुमच्या कारमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तरी तुम्हाला वॉरंटीचा फायदा घेता येणार नाही आणि स्वत:चे पैसे खर्च करावे लागेल.

कोणती किट लावावी?

मार्केटमध्ये सीएनजीसाठी अनेक कंपन्या किटची विक्री करतात. अशात कोणती किट निवडावी, याचा निर्णय घेणे कठीण जाते. तज्ज्ञांच्या मते, महाग किट लावण्यामागील दुष्परिणाम असा होतो की त्याची सर्व्हिस करणे कठीण जाते. कारण काहीच डिलरकडे अशी किट उपलब्ध असते. त्या जागेवर अशा किट निवड करावी, ज्याची सर्व्हिस करता येईल आणि गरज पडले तर त्याचे पार्ट्स सुद्धा खूप लवकर मिळेल. नवीन कारांमध्ये sequential kit लावणे, चांगले असते. या प्रकारचे किट लावताना ECU tuning पण केली जाऊ शकते.

हेही वाचा : दुबई पोलिस चालवणार Tesla Cybertruc; पोर्श, फेरारी सारख्या गाड्या आहेत त्यांच्या ताफ्यात

चांगल्या डीलरची निवड करावी

कारमध्ये सीएनजी किट लावताना नेहमी अधिकृत डीलर कडून किट लावावी. यामुळे तुम्ही चांगल्या प्रतीची किट मिळेल ज्यामुळे नंतर सुरक्षिततेवर धोका निर्माण होणार नाही.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things we should know before choosing a cng kit in your car which cng kit is perfect for you ndj