जर तुम्ही होंडा कारचे चाहते असाल आणि अशीच एक होंडा सेडान कार तुम्हाला घरी आणायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण होंडाची सेडान कार आता देशातील बाजारपेठेत नव्या अवतारात दाखल होणार आहे. जपानी कार उत्पादक कंपनी बाजारपेठेत नवा गेम खेळण्याच्या तयारित आहे. जबदस्त फीचर्सह लोकप्रिय कार नव्या रुपात दाखल करीत आहे.
होंडा आपल्या सर्वात लहान सेडान होंडा अमेझमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. कंपनी यावर्षी Amaze चा नवा अवतार लाँच करणार आहे. सध्याच्या अमेझची जागा घेणाऱ्या या तिसऱ्या पिढीतील अमेझमध्ये अनेक वैशिष्ट्ये असतील. नवीन अमेझ मारुती डिझायर, ह्युंदाई ऑरा आणि टाटा टिगोर यांच्याशी स्पर्धा करेल. होंडा सध्या भारतात विकत असलेली अमेझ कार २०१८ मध्ये बाजारात दाखल झाली होती. नवीन अमेझ दिवाळीपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ज्या प्लॅटफॉर्मवर सिटी आणि एलिव्हेट तयार करण्यात आली, त्याच प्लॅटफॉर्मवर नवीन अमेझ तयार केली जाईल. नवीन प्लॅटफॉर्ममुळे, या कारमध्ये काही बदल करण्यात येतील. कारचा व्हीलबेस होंडा सिटी (२६००mm) पेक्षा कमी असू शकतो. भारतात लाँच होणारी अमेझ कार परदेशात विकल्या जाणाऱ्या मोठ्या होंडा सेडानशी बरोबरी करेल असा विश्वास आहे.
(हे ही वाचा : ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI? )
ऑटोकार अहवालानुसार, Honda ची एंट्री-लेव्हल सेडान Amaze त्याच्या स्टायलिश डिझाइनसह येईल. नवीन केबिन लेआउट आणि एक मोठा आणि फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन सेटअप मिळणे देखील अपेक्षित आहे. एलिव्हेट आणि इतर होंडा कार सारखे फीचर्स यात पाहायला मिळतील.
होंडा सध्याच्या मॉडेलमधून १.२-लिटर, चार-सिलेंडर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह थर्ड जनरेशन अमेझ लाँच करू शकते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देखील येते. सध्याच्या कारप्रमाणेच नवीन अमेझची विक्री फक्त पेट्रोल इंजिनसह केली जाईल.
ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितले की, होंडा या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत नवीन अमेझ लाँच करणार आहे. दिवाळी २०२४ च्या आसपास हा नवीन Amaze लाँच होईल, अशी अपेक्षा आहे.