भारतात कार खरेदी करणं आता खूप सोप्प झालं आहे. तुमच्याकडे कार खरेदीसाठी पुरेसे पैसे असतील अनेक कार कंपन्यांकडून ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे कोणीही आता कार खरेदी करु शकतो. परंतु विचार करा, तुम्ही पैसे जमा करून खरेदी केलेली कार अचानक चोरीला गेली तर? हो, कारण आपल्या देशात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय, अशा परिस्थितीत आपली कारही सुरक्षित नाही. दररोज देशात हजारो वाहने चोरीला जातात. अनेकदा पोलीस या कार चोरांना शोधण्यास यशस्वी होता. पण बहुतांश वेळा आपल्याला ती कार गमवावी लागते. अशा परिस्थिती तुम्हाला जर तुमची कार चोरीला जाण्यापासून वाचवायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
१) कार नेहमी सुरक्षित ठिकाणी पार्क करा.
कार पार्क करताना तुम्ही निवडलेली जागा योग्य आहे का याची खात्री करून घ्या. अनेकदा घाईगडबडीत तुम्ही कुठेही कार पार्क करुन निघतो. असे केल्याने कार चोरी होण्याचा धोका वाढतो. कार नेहमी अशा ठिकाणी पार्क करा जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामुळे कारच्या आजूबाजूल काय घडामोडी घडल्या हे समजू शकेल, म्हणजे कार चोरी झालीच तर चोरांची माहिती मिळवण्यासाठी मदत होईल.
२) कारची चावी सुरक्षित ठेवा.
कारमधून बाहेर पडल्यानंतर कार एकदा पूर्णपणे लॉक झाली की नाही हे तपासून पाहा. तुम्ही चावी नीट ठेवली आहेत की नाही याची खात्री करा. चावी तशीच ठेवून कारमधून बाहेर जाऊ नका. विशेषत: हिवाळ्यात रस्त्यावर फार धूक असतं. त्यावेळी कारला चावी लावून बाहेर निघणं धोक्याचं ठरले. कारण कार जर तुम्ही स्वत:पासून थोडी दूर पार्क केली तर चोर त्या संधीचा फायदा घेऊ शकतात.
३) स्टियरिंग लॉक करा.
कार पार्किंग कुठेही उभी करता तेव्हा तिचे स्टिअरिंग लॉक करा, यामुळे कार चोरी होण्यापासून वाचवता येते. एखाद्या चोरट्याने कारचे लॉक जरी तोडले तरी स्टिअरिंग लॉकमुळे तो कार घेऊन लगेच पळून जाऊ शकणार नाही. अशावेळी स्टेअरिंग लॉक तोडण्याचा त्याने प्रयत्न केला तर त्याला वेळ लागेल, शिवाय तोपकडला जाण्याची भीती असते. त्यामुळे चोर सहसा कारचं स्टियरिंग लॉक तोडण्याचा प्रयत्न करत नाहीत.
४) जीपीएस ट्रॅकर वापरा
जीपीएस ट्रॅकरमुळे कारच्या रिअल टाइम लोकेशनवर लक्ष ठेवण्यास मदत होते. त्याचवेळी जीपीएसच्या मदतीने आपण कार कोणत्याही एका ठिकाणी पार्क करून लॉक देखील करू शकता. जीपीएस ट्रॅकरमुळे कार कुठेही गेली तरी लगेच समजते. काही डिव्हाइसमध्ये इमोबिलायझर्स देखील येतात, जे कारचे इंजिन दूरुनही बंद करण्यात मदत करतात.
५) मौल्यवान वस्तू कारमध्ये ठेवू नका.
कार कुठेतरी पार्क केली तरी त्यात कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवू नका. कारण अनेकदा चोर कारची काच फोडून आतील मौल्यवान वस्तू चोरतात. यामुळे तुमच्या मौल्यवान वस्तू तर चोरीला जातीलचं पण तुमच्या कारचेही नुकसान होईल. यामुळे मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागेल. तसेच कार कुठेही पार्क करुन नका.